शिक्षक बॅकेतील त्या पाच संचालकांवर अविश्वास ठराव पारीत

By जितेंद्र दखने | Published: January 4, 2024 09:24 PM2024-01-04T21:24:20+5:302024-01-04T21:24:55+5:30

विशेष सभेत: सोळा विरुद्ध पाच मतांना प्रस्तावर शिक्कामोर्तब

A no-confidence motion was passed on those five directors of the Teachers' Bank | शिक्षक बॅकेतील त्या पाच संचालकांवर अविश्वास ठराव पारीत

शिक्षक बॅकेतील त्या पाच संचालकांवर अविश्वास ठराव पारीत

अमरावती; जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँकेत मागील काही महिन्यांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये असलेले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अशातच सत्ताधारी गटाने विरोधी गटातील त्या पाच विरोधी संचालकाविरुद्ध सहकार कायदा १९६० च्या कलम ७३ ( १) ड पोटकलम २० (२) नुसार गुरूवार ४ जानेवारीला विभागीय सहनिबंधक यांनी बोलविलेल्या विशेष सभेत १६ विरुद्ध ५ मताने बॅकेचे संचालक प्रभाकर झाेड, मंगेश खेरडे,गौरव काळे,संजय नागे आणि मनोज चोरपगार या पाच विरोधी अविश्र्वास ठराव पारीत झाला आहे.

शिक्षक बॅकेची निवडणूक आटोपल्यापासून सत्ताधारी व विरोधी संचालकामध्ये अनेकवेळा संघर्ष उफाळून आला आहे. विरोधी गटातील पाच सदस्यांनी सेवानिवृत्त सभासदत्व रद्द करण्याची मागणी न्यायालयात केली होती.त्याला सत्ताधारी गटाने आक्षेप घेतला.त्यामुळे बॅक डबघाईस येईल असा युक्तीवाद सताधाऱ्यांनी केल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले.तञयाचवेयी विरोधी पाच संचालकांकडून वेळोवेळी बॅकेच्या विरोधात तक्रारी करीत अडथळे आणणे सुरू केले.यामुळे २१ मार्च २०२३ रोजी विभागीय सहनिबंधकांनी ती मागणी फेटाळून लावली. त्यानंतर बॅकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत व सत्ताधारी गटाने उच्च न्यायालयात धाव घेत विरोधी पाच संचालकांवर अविश्र्वासाची परवानगी मागीतली.त्यावर न्यायालयाने विभागीय सहनिबंधकांना यााबबत निर्णय घेण्याचे आदेश दिले.त्यानुसार विभागीय सहनिबंधक यांनी ४ जानेवारी रोजी विशेष सभेचे बोलवून त्या पाच संचालकांवरील अविश्र्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी परवानगी दिली.त्यामुळे गुरूवारी जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी साडेबाराला सभेला सुरूवात होताच पाच विरोधी संचालकांवर अविश्र्वास प्रस्ताव आणण्यात आला.त्यावर हात उंचावून मतदान झाल्यानंतर १६ विरूध्द ५ विरोधी संचालक मतांनी हा प्रस्ताव पारीत करण्यात आला.आणि पाच संचालक पायउतार झाले.राज्यात सहकार क्षेत्रात बहूदा पहिल्यांदाच सत्ताधारी गटाकडून विरोधी संचालकांवर अविश्र्वास आणल्याची चर्चा होत आहे.सभेला सत्ताधारी गटाचे शिक्षक बॅकेचे अध्यक्ष गोकुलदास राऊत, उपाध्यक्ष विजय कोठाळे, संचालक राजेश गाडे, तुळशीदास धांडे, प्रफुल्ल शेंडे, सुरेंद्र मेटे, कैलास कडू, मनिष काळे, उमेश चुनकीकर, अजयानंद पवार, रा.ना. गावंडे, रामदास कडू,मो.नाजीम,अ.गफ्फार,संभाजी रेवाळे, सरिता काठोळे,संगीता तडस आदीसह विरोधी संचालक प्रभाकर झाेड, मंगेश खेरडे,गौरव काळे,संजय नागे आणि मनोज चोरपगार,बॅकेचे सरव्यवस्थापक राजाभाऊ देशमुख,उपव्यवस्थापक साळवे उपस्थित होते.

विरोधी संचालकांकडून सातत्याने बॅक़ेच्या विकासासाठी आणण्यात आलेल्या ठरावांना विरोध करण्यात येत होता.सर्वच बाबींना विरोधकांकडून सर्वच बाबींना विरोधकांकडून तक्रारी करून बॅकेची बदनामी केली जात होती.त्यामुळे बॅकेच्या सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात होता.शिवाय अध्यक्षांसोबत असभ्य वर्तवणूक करणे आदी बाबत अनेकवेळा समाजावून सुध्दा ऐकत नसल्याने नियमानुसार अविश्र्वास प्रस्ताव पारीत केला.
गोकुलदास राऊत
अध्यक्ष शिक्षक बॅक

बँकेतील सोळा संचालकांनी सामान्य सभासदांचे प्रश्न पोट तिडकीने मांडणाऱ्या पाच प्रामाणिक काम करणाऱ्या संचालकांवर अविश्वास प्रस्ताव पारित करून लोकशाहीचा खून केला आहे. सोळा विरुद्ध पाच अशा मोठ्या बहुमताने निर्णय घेण्याची क्षमता असतानाही पाच संचालकांनी सभागृहातच राहू नये यासाठी त्यांच्यावर अविश्वास आणून त्यांना बाहेर काढणे ही लोकशाहीला काळीमा फासणारी घटना शिक्षकांच्या बँकेत घडली आहे. महाराष्ट्राच्या सहकार क्षेत्रातील ही पहिलीच घटना असेल. सर्व कायदेशीर बाबी तपासून सर्वोच्च न्यायालय आणि सहकार विभागाकडे दाद मागणार आहोत. सोबतच सामान्य सभासदांचे प्रश्न जनआंदोलनाच्या माध्यमातून मांडत राहू.
मंगेश खेरडे
संचालक (विरोधी गट)

Web Title: A no-confidence motion was passed on those five directors of the Teachers' Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.