आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला

By जितेंद्र दखने | Published: March 21, 2023 04:59 PM2023-03-21T16:59:41+5:302023-03-21T17:00:51+5:30

५ लाखावर लाभार्थ्याची निराशा

A ration of happiness now comes and goes only when the kit arrives; 5 lakh beneficiary's disappointed | आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला

आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा; गुढीपाडवाचा मुहूर्त हूकला

googlenewsNext

अमरावती : राज्य सरकारकडून बहूचर्चित आनंदाचा शिधा गुढीपाडवा दिवस उजाळल्यानंतर जिल्हाभरातील १ हजार ९१४ रेशन दुकानांपर्यत पोहोचलाच नाही.त्यामुळे शासनाने जाहीर केल्याप्रमाणे गुढीपाडवाचा तर मुहूर्त हुकला आहे. परिणामी लाभार्थीना आंनदाचा शिधा आता किट आल्यानंतरच ये-जा असे म्हणण्याची वेळ दुकानदारांवर आली आहे.गुढीपाडवाचा दिवस उजाळल्यावरही आनंदाचा शिधा न मिळाल्याने रेशनकार्ड धारकांची निराशा झाली आहे.

राज्य शासनाने आता गोरगरीबांना दिवाळीला जसा दिवाळीनिमित्त आनंदाचा शिधा वाटप केला.त्याच प्रमाणे गुढीपाडवा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अंत्योदय, केशरी आणि प्राधान्य गटामधील रेशनकार्डधारक कुटूंबातील लाभार्थ्याना आनंदाचा शिधा १०० रूपयात देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जिल्ह्यातील ५ लाख ५७ हजार २४७ लाभार्थ्याना हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा निमित्त १ हजार ९१४ रेशन दुकानदारांमार्फत वितरीत केला जाणार होता. मात्र गुढी पाडव्यात मुहूर्तावर गोरगरीब लाभार्थ्याचा आनंदाचा शिधा ( धान्य किट) मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.गुढीपाडव्याचा दिवस उजाडला असतांना जिल्ह्यातील २० गोडावूनमध्ये अजूनही पोहोचले नाही. त्यामुळे आनंदाचा शिधा किट साठी रेशन दुकानात आलेल्या लाभार्थ्याना आनंदाचा शिधा आता किट आल्यावरच ये-जा असेच उत्तर दुकानदारांना सांगितल्याशिवाय पर्याय नाही.

रेशन कार्डधारक संख्या
प्रकार- कार्डधारक
अंत्योदय-१२१५१६
केशरी-३२०९६८
प्राधान्य-११५५६३
एकूण-५५७२४७
रेशन दुकाने -१९१४

गुढीपाडवा आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त राज्य सरकारने अंत्योदय,केसरी,प्राधान्य गटातील रेशनकार्ड धारकांना शंभर रूपयात आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले आहे.मात्र अजूनपर्यत आनंदाचा शिधा किट रेशन दुकानापर्यत पोहोचलेल्या नाहीत.त्यामुळे या किट उपलब्ध झाल्यानंतर वितरण होईल.

- सुरेश पाटील उल्हे, जिल्हाध्यक्ष, स्वस्तधान्य रेशन दुकानदार संघ

Web Title: A ration of happiness now comes and goes only when the kit arrives; 5 lakh beneficiary's disappointed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.