धावत्या एसटी बसने अचनाक घेतला पेट; चालकाची सतर्कता, ३५ प्रवासी सुखरूप

By प्रदीप भाकरे | Published: November 1, 2022 05:34 PM2022-11-01T17:34:09+5:302022-11-01T17:45:02+5:30

अग्निशन दलाच्या पथकाने केले रेस्क्यू

A running ST bus catches fire in amravati; all 35 passengers rescued safely | धावत्या एसटी बसने अचनाक घेतला पेट; चालकाची सतर्कता, ३५ प्रवासी सुखरूप

धावत्या एसटी बसने अचनाक घेतला पेट; चालकाची सतर्कता, ३५ प्रवासी सुखरूप

Next

अमरावती : अकोल्याहून नागपूरला निघालेल्या गणेशपेठ आगाराच्या धावत्या एसटी बसने अचानक पेट घेतल्याने त्या एसटी बसचा कोळसा झाला. नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिंपळविहिर गावानजिक ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन पथकाने तातडीने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली. एसटीमध्ये चालक वाहकांसह ३५ प्रवासी होते. चालकाच्या सतर्कतेने ते सर्व प्रवासी सुखरूप बचावले.

नागपूरस्थित गणेशपेठ आगाराची एम एच १४ बी टी ४४११ ही अकोला नागपूर बस अकोलाहून नागपूरकडे जात असतांना मंगळवारी दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान पिंपळविहिरनजीक एसटी बसच्या इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाचे लक्षात आले. त्याने प्रसंगावधान साधून रस्त्याच्या कडेला बस थांबविली. तथा सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. बघता बघता क्षणार्धात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. चालकाने तातडीने नांदगाव पेठ पोलीस स्टेशन, महापालिकेच्या अग्निशमन पथकाला पाचारण केले.

चालकाचे काैतूक

नांदगाव पेठचे ठाणेदार प्रवीण काळे ताफ्यासह घटनास्थळी पोहचले. महामार्गावर वाहनांची झालेली कोंडी पोलिसांनी सुरळीत केली. काही वेळात अग्निशमन दलाचे कर्मचारी सुद्धा घटनास्थळीदाखल झाले व आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत एसटीचा संपूर्ण कोळसा झाला होता. विशेष म्हणजे चालकाने दाखविलेल्या धाडसाचे आणि सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. चालकाने प्रसंगावधान साधले नसते तर काही क्षणात होत्याचे नव्हते झाले असते.

Web Title: A running ST bus catches fire in amravati; all 35 passengers rescued safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.