मेळघाटच्या पिली गावात सात मतदारांसाठी आठ कर्मचाऱ्यांचे पथक
By गजानन उत्तमराव मोहोड | Published: April 26, 2024 11:35 AM2024-04-26T11:35:22+5:302024-04-26T11:37:25+5:30
Melghat : मारिता केंद्रावर मोबाइल आणि वॉकीटॉकीचीही रेंज नाही
अमरावती : गेळघाटच्या पिली मतदान केंद्रांवर सात मतदार आहेत. विशेष म्हणजे, मतदान पथकात आठ कर्मचारी आहेत. अशीच स्थिती पस्तलाई गावात आहे. येथे १३ मतदार आहेत. मारिता या केंद्रांवर मोबाइलची रेंज तर दूर, वॉकीटॉकीचीही रेंज नसल्याने रनरचा वापर निवडणूक विभाग करत आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान महत्त्वाचे आहे. यासाठी आयोगाचा व पर्यायाने निवडणूक यंत्रणेचा आटापिटा असतो. आयोगाच्या विशेष परवानगीने मेळघाट मतदारसंघातील १३६ केंद्रांमध्ये मतदानाच्या दोन दिवस आधीच मतदान पथक या केंद्रांवर पोहोचले आहे.
मतदानाचा हक्क बजावल्यानंतर विकासाची पहाट उजाडेल, या आशेने आदिवासी बांधव मतदान करत असल्याचे पाडांमधील वास्तव आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात या गावांचे पुनर्वसन झाले. परंतु, तीन कुटुंबांनी पुनर्वसनाला नकार दिल्याने ते अद्याप या गावातच वास्तव्याला आहेत,
मेळघाटातील अतिदुर्गम भागात बुधवारी २३६ केंद्रांचर तर उर्वरित केंद्रांवर गुरुवारी पथके रवाना करण्यात आली. सर्वांत कमी सात मतदार पिली केंद्रावर व १३ मतदार पस्तलाई केंद्रावर आहेत. येथे मतदान पथक दोन दिवसांपूर्वी रवाना करण्यात आले.
- रिचर्ड यांथन, सहायक जिल्हाधिकारी तथा एआरओ. मेळघाट
स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतरही २१ गावांमध्ये अंधार
मेळघाटात २१ गावे अजूनही अंधारात आहेत. ४० गावांत रस्ता नाहीं तर २० पेक्षा अधिक गायांमध्ये अजूनही मोबाइल पोहोचलेला नाही. अनेक गाये मोबाइल नेटवर्कचिना असल्याने मतदान प्रक्रियेत वन व पोलिस विभागाच्या वॉकीटॉकीचा वापर करण्यात येत आहे.
मेळघाट मतदारसंघातील रक्षा, कुंद्र, रंगुबेली, खोपमार, चोपण, बोकडा, खामटा, किन्हीखेडा, खुटीटा, सुमिता, मारिता, सरोवरखेडा, रायपूर, बोराख्या, माखला, माडीझडप, चुनखडी, नवलगाव, बिचायखेडा आदी गाये विद्युत पुरवठ्याअभावी अंधारातय आहेत.
पॉवर बँकेचा जोड अन् रनरची साथ
वॉकीटॉकीचीही रेंज नसलेल्या गावात मतदान आकडेवारी सांगणे व कुठलीही अडचण आल्यास एक कर्मचारी (स्नर) वाहनाद्वारे रेंज असलेल्या भागात पोहोचतो व एआरओना फोन करतो. शिवाय विद्युत पुरवठा नसलेल्या गावांत केंद्रांसाठी पॉवर बैंक देण्यात आली आहे.