तलवारबाज, चाकुबाजांचे त्रिकूट जेरबंद; १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त

By प्रदीप भाकरे | Published: October 9, 2024 04:30 PM2024-10-09T16:30:53+5:302024-10-09T17:08:06+5:30

क्राईम युनिट एकची कारवाई : नागपुरी गेट हद्दीतून पोत्यात घेऊन जात होते घातक शस्त्रे

A trio of swordsmen, knife-wielders, jailed; 1 lakh 4 thousand 500 rupees forfeited | तलवारबाज, चाकुबाजांचे त्रिकूट जेरबंद; १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त

A trio of swordsmen, knife-wielders, jailed; 1 lakh 4 thousand 500 rupees forfeited

प्रदीप भाकरे 
अमरावती :
एका पांढऱ्या पोत्यात दोन तलवारी व चायना चाकू बाळगून असणाऱ्या तिघांना गुन्हे शाखा युनिट एकने बुधवार अटक केली. नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कडबी बाजार पोलीस चौकीजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून दोन तलवारी, चायना चाकू व दुचाकी असा एकुण १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.
           

आरेष खान आरिफ खान (वय १९ वर्षे रा. हैदरपुरा), मुजाहिद खान मतीन खान (वय १८ वर्षे रा. रहेमत नगर) व शेख रेहान शेख नौशाद (वय १८ वर्षे रा. सरकारी दवाखान्याजवळ रहेमत नगर, अमरावती) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपी मुजाहिद खान याचेजवळ एक पांढरे पोते आढळून आले. त्यात दोन तलवारी आढळून आल्या. तर, अन्य एकाच्या कमरेत चाकू खोसलेला आढळून आला. गुन्हे शाखा युनिट एकचे पथक नागपुरी गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना त्यांना कडबी बाजार पोलीस चौकीजवळ एका दुचाकीवर तीन इसम हे काळया रंगाच्या दुचाकीवर संशयास्पदरित्या जात असताना दिसून आले. त्यांना थांबवून झाडाझडती घेतली असता चाकु व तलवारी आढळल्या. आरोपी व जप्त मुददेमाल नागपूरी गेट पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आला. त्यांच्याविरूध्द शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलीस उपायुक्त कल्पना बारवकार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजीराव बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिटप्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सहायक पोलीस निरिक्षक मनीष वाकोडे, उपनिरिक्षक प्रकाश झोपाटे, हवालदार सतीष देशमूख, अंमलदार फिरोज खॉन, अलीमउददीन खतीब, नाझीमउददीन सैयद, विकास गुडदे, सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहर,रोशन माहुरे, किशोर खेंगरे यांनी ही कारवाई केली.

Web Title: A trio of swordsmen, knife-wielders, jailed; 1 lakh 4 thousand 500 rupees forfeited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.