दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकीला कंटाळून विहिरीत घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2022 10:42 AM2022-10-27T10:42:34+5:302022-10-27T10:46:10+5:30

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील घटना

A young farmer committed suicide on the second day of Diwali | दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकीला कंटाळून विहिरीत घेतली उडी

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच युवा शेतकऱ्याची आत्महत्या; नापिकीला कंटाळून विहिरीत घेतली उडी

googlenewsNext

अंजनगाव सुर्जी (अमरावती) : तालुक्यातील पांढरी खानापूर येथील अल्पभूधारक शेतकरी विशाल सुभाष मिसार (२७) याने मागासवर्गीय वसतिगृहाच्या मागील भागात महादेवराव पोटे (रा. अंजनगाव) यांच्या शेतातील शंभर फूट खोल विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. २५ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली.

पोलीस सूत्रांनुसार, विशाल हा अल्पभूधारक शेतकरी असून कुटुंबात दोन एकर शेती आहे. त्याच्या पश्चात आई, बहीण व भाऊ आहे. दिवाळीच्या दिवशी आत्महत्या करण्याचा विचार त्याच्या मनात घोळत होता, असे काही नागरिकांनी सांगितले.

दरम्यान, महादेवराव पोटे शेतात काम करत असताना त्यांना एक व्यक्ती विहिरीजवळ उभी असल्याचे दिसले. ते पोहोचत नाही तोच विशालने अंगातील टी-शर्ट, चप्पल काढून विहिरीच्या काठावर ठेवली व खोल विहिरीत उडी घेतली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न गावातील नागरिकांनी केला. काही जणांनी विहिरीत उतरून मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, तो गाळात फसला होता. पांढरी येथील सामाजिक कार्यकर्ते रिंकू करमसिदे, मुन्ना शेख यांनी विहिरीत उतरून मृतदेह काढला. अंजनगाव पोलिसांनी पंचनामा केला.

Web Title: A young farmer committed suicide on the second day of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.