धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 11:20 PM2024-10-08T23:20:36+5:302024-10-08T23:20:53+5:30

मारेकरी तरुणी फरार, सुपर एक्स्प्रेस हायवेवरील घटना

A young woman kills a young woman in a love triangle | धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या

धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या

प्रदीप भाकरे , अमरावती : प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने एका तरुणीची चाकूने हल्ला करून हत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवार, ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास राजापेठ ठाण्याच्या हद्दीतील सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ घडली. घटनेनंतर मारेकरी तरुणी फरार झाली असून पोलीस तिचा शोध घेत आहेत.

शुभांगी  (२६,रा. आर्वी, वर्धा) असे मृताचे नाव आहे. शुभांगीच्या परिचयातील तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध आहेत. त्याचे शुभांगीसोबतही प्रेमसंबंध असल्याचा संशय त्याच्या प्रेयसीला होता. त्या कारणावरून त्यांच्यात वाद होत होते. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मंगळवारी शुभांगी ही एका मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीत आली होती. त्यामुळे तरुणाने आपल्या प्रेयसीची शुभांगीसोबत भेट घालून देण्यासाठी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास तिला सुपर एक्स्प्रेस हायवेवरील एका मंदिराजवळ बोलाविले.

शुभांगी तेथे पोहोचल्यावर तरुणाच्या प्रेयसीने तिच्यासोबत वाद घातला. या वादात तिने शुभांगीवर चाकूने हल्ला चढविला. त्यात ती गंभीर जखमी झाली. तरुणाने शुभांगीला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच राजापेठचे ठाणेदार पुनीत कुलट यांनी आपल्या ताफ्यासह जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले. पोलीस उपायुक्त गणेश शिंदेही तेथे पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पोलीस फरार झालेल्या तरुणीचा शोध घेत आहेत. याप्रकरणी मारेकरी तरुणाच्या प्रियकराला ताब्यात घेण्यात आले आहे. मारी कधी तरुणी ही दिवसा तालुक्यातील कुऱ्हा भागातील रहिवाशी असल्याचे समजते.

Web Title: A young woman kills a young woman in a love triangle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.