तळेगावातील युवकाचा वीज अंगावर कोसळून मृत्यू
By जितेंद्र दखने | Published: June 10, 2024 05:22 PM2024-06-10T17:22:40+5:302024-06-10T17:23:19+5:30
अंगावर वीज कोसळल्याने करणचा मृत्यू झाला.
तळेगाव दशासर (अमरावती) : धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथील वॉर्ड क्रमांक ६ येथील यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील अल्लीपूर शिवारात २१ वर्षीय मेंढपाळ करण हरिभाऊ शिंदे याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला.
रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. तो एक दिवसापूर्वीच आपल्या मेंढ्या घेऊन बाभूळगाव तालुक्यातील कोठा फत्तेपूर बेंबळा धरणाजवळील शिवारात बेड्यावर गेला होता. रविवारी सायंकाळी मेंढ्या चारत असताना आभाळ भरून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला.
काही क्षणात अंगावर वीज कोसळल्याने करणचा मृत्यू झाला. तळेगाव दशासर पोलिस ठाण्याचे पी.एस.आय. गोटे हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हा परिसर बाभूळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने पुढील कारवाईसाठी तेथील पोलिस पथकही दाखल झाले होते.