'आप'चा जिल्हा कचेरीवर धडकला मोर्चा
By admin | Published: August 18, 2015 12:27 AM2015-08-18T00:27:28+5:302015-08-18T00:27:28+5:30
आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला
आरडीसींना निवेदन : विविध मागण्यांचा समावेश
अमरावती : आम आदमी पार्टीच्या वतीने सोमवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन दिले. त्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये जिल्हा सामान्य रूग्णालयात सीटीस्कॅन मिशीन सुरू करण्यात यावी, नांदगाव पेठ येथील एमआयडीसीत सुरू होणाऱ्या टेक्सटाईल पार्कमध्ये उद्योगाबाबत बेरोजगारांना प्रशिक्षण द्यावे, शेतकऱ्यांना कृषी पंप जोडणीचे वीज कनेक्शन त्वरित देण्यात यावे, कामगारांना महाराष्ट्र अधिनियम १९४८ नुसार वेतन देण्यात यावे, एपीएल शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात यावे, शिक्षणाधिकारी कार्यालयातील अनागोंदी कारभार त्वरित बंद करावा, आदी मागण्या पूर्ततेची मागणी निवेदनाव्दारे जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. यावेळी महेश देशमुख, किशोर वानखडे, सुधिर तायडे, मारोती बागडे, रंजना मामर्डे, रवी कावरे व आपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)