उकृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2018 11:32 PM2018-01-03T23:32:22+5:302018-01-03T23:32:45+5:30

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्याचा जागर करणाऱ्या तसेच गरोदर माता व नवजातांच्या सुदृढ आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविकांना बुधवार, ३ जानेवारी रोजी गौरविण्यात आले.

Aasha Sevikas honored with excellence | उकृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

उकृष्ट कार्य करणाऱ्या आशा सेविकांचा सन्मान

Next

आॅनलाईन लोकमत
अमरावती : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण, आदिवासी भागात आरोग्याचा जागर करणाऱ्या तसेच गरोदर माता व नवजातांच्या सुदृढ आरोग्याची काळजी वाहणाऱ्या आशा सेविकांना बुधवार, ३ जानेवारी रोजी गौरविण्यात आले. जिल्हा परिषदेचे हे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे पार पडले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, आरोग्य सभापती बळवंत वानखडे, शिक्षण सभापती जयंत देशमुख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, जिल्हा आरोग्य अधिकारी सुरेश असोले, जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम, दिलीप निकोसे, संतोष माने, दिलीप चºहाटे, रमेश बनसोड, रवींद्र किटुकले यांच्या हस्ते आशा सेविकांचा गौरव करण्यात आला.
विचोरी प्राथमिक आरोग्य केंद्राशी संलग्न जसापूर येथील प्रतिभा ढोमणे यांनी उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला. सलोना येथील सोनकी खडके यांना द्वितीय पुरस्काराने गौरविले. सर्वोकृष्ट गटप्रवर्तिकेचा पुरस्कार टेंब्रुसोडा येथील रूपाय बेलसरे यांना, तर द्वितीय पुरस्कार करजगाव येथील वंदना पारधी यांनी मिळविला. पीएचसी अंतर्गत मंगरूळच्या मनीषा भुसारी, हिवखेडच्या वैशाली चौधरी आणि आमला एंडली येथील अंजली तानोड यांनादेखील यावेळी सन्मानित करण्यात आले.
जिल्हाभरातील १४ आशा स्वयंसेविकांनाही रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
विशेष म्हणजे, आशा स्वयंसेविका योजनेत सन २०१६-१७ मध्ये उकृ ष्ट कार्य केल्याबद्दल तुकाराम आऊलवार, स्नेहल लोखंडे, सरला सोनोने, गोकुल ठाकूर, पंकज औरंगपुरे, संतोष निंभोरकर, मनीष हटवार, उमेश आगरकर, गोपाल क्षीरसागर, धनंजय साऊरकर आदी आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयांचाही सन्मान करण्यात आला.
पुरस्कार वितणानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. कार्यक्रमाचे संचालन उमेश आगरकर, तर आभार प्रदर्शन शशिकांत तभाने, साईकिरण खांडरे यांनी केले. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे शशिकांत तभाने, अशोक कोठारी, नीलेश देविकर, प्रफुल्ल रिधोरे, अमोल ढोले, राहुल वानखडे, दिनेश नागे आदींनी आयोजनात सहकार्य केले.

Web Title: Aasha Sevikas honored with excellence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.