आबासाहेब बुरघाटे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 07:10 PM2019-01-07T19:10:13+5:302019-01-07T19:10:21+5:30
विदर्भातील नामांकित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब विश्वासराव बुरघाटे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते.
अमरावती - विदर्भातील नामांकित श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष आबासाहेब विश्वासराव बुरघाटे यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी ते ७५ वर्षांचे होते. ते काही दिवसांपासून आजारी होते.
श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे तत्कालिन अध्यक्ष स्व. वसंतराव धोत्रे यांच्या कार्यकाळात आबासाहेबांनी उपाध्यक्ष पद भूषविले होते. भारतीय महाविद्यालयात वाणिज्य शाखेचे प्राध्यापक, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, वाणिज्य विद्याशाखेचे अधिष्ठाता, भूमिपूत्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषविली. त्यांच्या पश्चात प्रा. मुकुल, ब्रिजेश, माधव ही तीन मुले, सुना, नातवंड व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, ८ जानेवारी रोजी सकाळी १० वा. काँग्रेसनगरस्थित त्यांच्या निवासस्थानाहून निघेल. प्रा. आबासाहेब बुरघाटे यांच्या निधनाने शिवपरिवार व सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे.