प्रियकराच्या मदतीने बहिणीच्या मुलाचे अपहरणनाट्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2021 05:00 AM2021-10-06T05:00:00+5:302021-10-06T05:00:56+5:30

नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दाम्पत्य काही वर्षांपूर्वी सुरत येथे स्थायिक झाले. मागील पाच वर्षांपासून त्याची  पत्नी  पूनम (नाव बदललेले)  एका अविवाहिताच्या प्रेमात पडली.  दोन महिन्यांपासून ती दोन मुलांसमवेत ती सुरत येथेच स्वतंत्र राहू लागली. त्यांच्यात खटके उडू लागल्याने पतीने आपली दोन्ही मुले सुरक्षितरीत्या पत्नीच्या ताब्यातून अमरावतीला आणली. ते पूनमला सहन झाले नाही. मुलाला परत आणण्यासाठी तिने प्रियकर कुणाल विठ्ठल वडवाडे (२४, मु. दोनद, ह.मु. सुरत) याच्यासोबत कट रचला.

Abduction of sister's son with the help of boyfriend | प्रियकराच्या मदतीने बहिणीच्या मुलाचे अपहरणनाट्य

प्रियकराच्या मदतीने बहिणीच्या मुलाचे अपहरणनाट्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : प्रियकराच्या मदतीने एका महिलेनेच स्वत:च्या बहिणीच्या मुलाचे शस्त्राच्या धाकावर अपहरण घडवून आणले. मात्र, राजापेठ पोलिसांच्या सजगतेने ते नाट्य फसले. अपहृत मुलाची सोडवणूक करण्यात आली. तर त्या महिलेसह, तिचा प्रियकर व अन्य दोघे अशा एकूण चौघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून चार धारदार चाकू, दोन दुचाकी, मोबाईल असा ऐवज जप्त करण्यात आला. सामरानगर भागात मंगळवारी दुपारी हा थरार घडला. चौघेही आरोपी सुरत येथील रहिवासी आहेत. 
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एक दाम्पत्य काही वर्षांपूर्वी सुरत येथे स्थायिक झाले. मागील पाच वर्षांपासून त्याची  पत्नी  पूनम (नाव बदललेले)  एका अविवाहिताच्या प्रेमात पडली.  दोन महिन्यांपासून ती दोन मुलांसमवेत ती सुरत येथेच स्वतंत्र राहू लागली. त्यांच्यात खटके उडू लागल्याने पतीने आपली दोन्ही मुले सुरक्षितरीत्या पत्नीच्या ताब्यातून अमरावतीला आणली. ते पूनमला सहन झाले नाही. मुलाला परत आणण्यासाठी तिने प्रियकर कुणाल विठ्ठल वडवाडे (२४, मु. दोनद, ह.मु. सुरत) याच्यासोबत कट रचला. ती कुणाल व अन्य दोघांना घेऊन दोन दुचाकीने चक्क सुरतहून मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास अमरावतीत पोहोचली. सामरानगर येथे राहत असलेल्या बहिणीच्या मुलाचे अपहरण करायचे, त्याच्या सुटकेच्या मोबदल्यात आपला मुलगा परत मागायचा,  असा तो कट होता.
 त्यानुसार, आरोपी कुणालने अमरावतीत पोहोचल्यानंतर पूनमच्या बहिणीला फोनवरून धमकी दिली. त्याबाबतची तक्रार देण्यास ती राजापेठ पोलीस ठाण्यात पोहोचली असताना, कुणाल व अन्य दोघे हाती चाकू घेऊन सामरानगर परिसरातील त्या घरात शिरले. चाकूचा धाक दाखवत त्यांनी पूनमच्या बहिणीच्या १२ वर्षीय मुलाचे अपहरण केले. त्याला दुचाकीवर घेत त्यांनी पळ काढला. ही माहिती पूनमच्या आईने तिला दिली.  माहिती देताच पोलिसांनी आरोपींना नवाथेमधून अटक केली.

पूनम थांबली शारदानगरात
याप्रकरणी कृणाल वरवाडे, अनिल धरमसिंग सरवय्या (२४, सुरत) व विशाल यादव (१८, सुरत) यांना अटक करण्यात आली. त्यांचेकडून चाकू व नवी कोरी मोपेड जप्त करण्यात आली. सूत्रधार पूनम ही शारदानगर भागात थांबली असल्याचे आरोपींनी सांगितले. त्यावरून तिला अटक करण्यात आली. तिच्याकडून अन्य एक दुचाकी जप्त करण्यात आली. चाैघांविरुद्ध कट रचणे, अपहरण व आर्मॲक्टअन्वये गुन्हा नोंदविला. कृणालवर सुरत येथे तीन, तर अनिलवर हत्येचा गुन्हा दाखल असल्याची माहिती ठाणेदार मनीष ठाकरे यांनी दिली. ही कारवाई सीपी डॉ. आरती सिंह व डीसीपी विक्रम साळी यांच्या नेतृत्वात राजापेठच्या डीबी स्कॉडने यशस्वी केली.

 

Web Title: Abduction of sister's son with the help of boyfriend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.