अभिजित अडसूळ करोडपती ४.६८ कोटींच्या संपतीची नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:27 AM2024-10-28T11:27:37+5:302024-10-28T11:28:58+5:30
Amravati : शपथपत्रानूसार १५ कोटींची स्थावर मालमत्ता अन् ५.१२ कोटींचे दायित्व
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये शिंदेसेनेचे उमेदवार अभिजित अडसुळ हे आतापर्यंत दाखल उमेदवारी अर्जात सर्वात श्रीमंत उमेदवार ठरले आहे. त्यांच्याकडे ४.६८ कोटींची जंगम अन् १५ कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे शपथपत्रातील नोंदीवरुन स्पष्ट झाले आहे. त्यांच्याकडे ४५० व पत्नीकडे ८०० ग्रॅम सोने आहे.
अडसुळ यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यासोबत त्यांनी शपथपत्र जोडले. त्यांच्याविरुद्ध एकही गुन्हा नाही. आयकर विवरणपत्रानुसार २०२४-२५ मध्ये त्यांचे वार्षिक उत्पन्न ३१,५१,६१० रुपये आहे. त्यांच्याकडे १,५७,५०० रुपये रोख आहे. बँक ऑफ बडोदा कांदिवली ९,२९,७५१ रुपये, एचडीएफसी, कांदिवली १,६६,४३७ रुपये, आयसीआयसीआय ३,६९,०९१ रुपये, एसबीआयमध्ये १७,९०,६५१ रुपये आहेत. बैंक ऑफ बडोदामध्ये ५६,०३,५३८ रुपयांची मुदत ठेव आहे. युआरव्ही कन्सल्टन्सीमध्ये १,७६,९८२, युआरव्ही डेव्हलपर्समध्ये १,१३,०९,१७२ रुपयांची गुंतवणूक आहे. कृष्णकांत चतूर १ लाख, मित्र व नातेवाईकांकडून ८,०९४४२ रुपये, निमिषा गजाकोष २९ लाख, पारिजात कन्स्ट्रक्शन २६ लाख, कल्पेशन मिस्त्री १.३० कोटी, युआरव्ही डेव्हलपर्स १२.८६ लाख व युआरव्ही फुड २,०७,६५५ रुपयांची गुंतवणूक आहे. त्यांच्या मालकीचे १७ लाखांचे वाहन आहे.
सातारा जिल्ह्यात शेत अन् मुंबई परिसरात प्लॅट
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील मौजा शिरंबे येथे ४१ लाखांचे शेत, कांदीवली पूर्व येथे दुकान (बाजारमुल्य २ कोटी), अंजनगाव येथे फ्लॅट, मौजे वाढवण, कांदीवली येथे कल्पतरू गार्डन येथे २ व कल्पतरू विएंता टॉवर येथे २ फ्लॅट एकूण मूल्य १५.१६ कोटी आहे. शपथपत्रातील नोंदीनूसार ५,१२,५८,१८० रुपयांचे कल्पतरू विएंता यांचे दायित्व आहे. अडसुळ यांच्या पत्नीकडे १,०६,७३,९५३ रुपयांची जंगम व ६० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.