उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

By admin | Published: July 9, 2017 12:18 AM2017-07-09T00:18:31+5:302017-07-09T00:18:31+5:30

शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे.

About the flyover | उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

उड्डाणपुलाविषयी प्रशासन निद्रिस्त

Next

काय चाललंय अमरावतीत : प्रशासकीय यंत्रणेत समन्वयाचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहराची शान असलेल्या राजापेठ ते इर्विन चौकपर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था असताना स्थानिक प्रशासन मात्र डोळेझाक करीत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकण्याचे प्रयत्न करीत आहे. समन्वयाच्या अभावामुळे अमरावती शहराची शान धुळीस मिळत असतानाही प्रशासन निद्रिस्तच आहे. त्यामुळे काय चाललंय अमरावतीत, असा प्रश्न अमरावतीकरांना भेडसावत आहे.
१०० कोटींच्या जवळपास पैसा खर्च करून राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतचा उड्डाणपूल बांधकाम एमएसआरडीसीमार्फत करण्यात आले. त्यानंतर या उड्डाणपुलाची जबाबदारी नेमकी कुणाकडे हस्तांतरित झाली. त्याची देखभालीची जबाबदारी कुणाची, हा एक संशोधनाचा विषय बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीत असणारा हा उड्डाणपूल आता बेवारस स्थितीत आहे. उड्डाणपुलावरील रस्ता खडतर झाला असून अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. पुलावरील पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्गच उरले नाही. पाणी खाली जाण्याच्या ठिकाणी साचलेल्या मातीत नैसर्गिक वृक्षारोपण झाले आहे. विद्युत बॉक्स तुटफूट झाले आहेत, अशा समस्या अनेक दिवसांपासून उड्डाणपुलावर दृष्टीस पडत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. आधीच उड्डाणपुलावरून खाली कोसळून अनेक जीव गेले आहेत. दररोज खड्डे व माती दगडांमुळे अपघात घडत आहे. आता आणखी जीव जाण्याची प्रतीक्षा तर शहर प्रशासन करीत नाही, अशी शंका येत आहे. महापालिका म्हणते, आमची जबाबदारी नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणते, उड्डाणपुलाची जबाबदारी आमची नाही तर मग अमरावतीकरांनी कुणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही शासकीय विभाग जबाबदारी झटकत असताना लोकप्रतिनिधी गप्प का? स्वच्छेतेची जबाबदार ही महापालिकेचीच आहे. मग स्वच्छता विभाग काय करीत आहे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

आ. देशमुख देतील काय लक्ष ?
तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांच्या कार्यकाळात बनलेला राजापेठ ते इर्विन चौकापर्यंतच्या उड्डाणपुलाची दुरवस्था पाहता प्रशासकीय कामांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. सुनील देशमुख हे शहराचे आमदार सुद्धा आहेत. देशमुख शहर विकासासाठी अथक परिश्रम घेत आहे. मात्र, त्यांच्या कार्यकाळात बनलेल्या या उड्डाणपुलाकडे दुर्लक्ष करून चालेल का, याकडे आ.सुनील देशमुख लक्ष देतील काय, असा प्रश्न अमरावतीकर उपस्थित करीत आहेत.

Web Title: About the flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.