कार्यालयात विनापरवानगी गैरहजर राहील्यास कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:10 AM2021-06-18T04:10:08+5:302021-06-18T04:10:08+5:30
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी कार्यालयातील गर्दी मर्यादीत ठेवण्यात आली होती.अशातच ...
अमरावती : जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येणाऱ्या विविध विभागातील कोविड १९ च्या प्रतिबंधासाठी कार्यालयातील गर्दी मर्यादीत ठेवण्यात आली होती.अशातच जिल्हाधिकारी यांचे १५ जून रोजीच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील निर्बंध शिथिल केल्याने कार्यालातील अधिकारी,कर्मचारी यांची उपस्थिती १०० टक्के बंधनकार आहे.असे असतांना मिनीमंत्रालयातील कर्मचारी उपस्थिती कमी असल्याचे सीईओंच्या निर्दशनास आले.त्यामुळे यापुढे कार्यालयातील उपस्थिती पूर्ण क्षमतेने ठेवावी अन्यथा विनापरवानगी आढळून आलेल्या संबंधित अधिकारी,कर्मचारी यांचे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सीईओ अविश्यांत पंडा यांनी खातेप्रमुखांना पाठविलेल्या लेखी पत्राव्दारे दिला आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती मर्यादीत ठेवण्यात आली होती.अशातच आता कोरोनाचा संसर्ग कमी झाला आहे.त्यामुळे निर्बंधही शिथिल केले आहे.यानुसार जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील सर्व विभागातील कर्मचारी उपस्थिती १०० टक्के ठेवण्याचे निर्देश सीईओंनी १५ जून रोजी जारी केले होते.मात्र सीईओंनी काढलेल्या आदेशानुसार १६ जुन रोजी विविध विभागाची पाहणी केली असता अनेक विभागात अधिकारी व कर्मचारी कार्यालयात वेळेवर येत नसल्याचे तसेच विनापरवागी गैरहजर असल्याचे दिसून आले.परिणामी कामानिमित्त झेडपी येणारे लोकप्रतिनिधी आणि ग्रामीण भागातून येणारे नागरिक यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना संबंधित अधिकारी,कर्मचारी अनुउपस्थितीमुळे नाहक त्रास होतो.परिणामी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत वर्तमान पत्रातून प्रसिध्द होणाऱ्या बातम्यामधून संस्थेविषयी नकारात्मक भावना निर्माण होते.त्या अनुषंगाने सीईओंनी यापुढे सर्व विभाग प्रमुख यांनी मुख्यालयीन हजर राहण्याचे दिवसी नागरिकांच्या समस्या,निवेदने, तक्रारी ऐकूण घेण्यासाठी विभागात हजर राहावे, तसेच कार्यालयीन कर्मचारी नियमितपणे वेळेवर हजर राहतील याबाबत नियमितपणे हजेरीपंजी तपासावी अशा सूचना सीईओंनी खातेप्रमुखांना दिल्या आहेत.