'त्या' अत्याचारग्रस्त मुलीचा गर्भपात
By admin | Published: January 25, 2016 12:16 AM2016-01-25T00:16:31+5:302016-01-25T00:16:31+5:30
तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झालेल्या अत्याचारग्रस्त महिलेचा रविवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्यात आला.
न्यायालयीन आदेश : भ्रूणाचे होणार डीएनए चाचणी
अमरावती : तीन महिन्यांपूर्वी बलात्कार झालेल्या अत्याचारग्रस्त महिलेचा रविवारी जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. त्या भ्रूणाचे डीएनए तपासणी नागपूर येथील न्याय वैद्यक प्रयोगशाळेत केली जाईल. न्यायालयीन आदेशाने लोणी पोलिसांनी ही कारवाई केली.
लोणी ठाण्यांच्या हद्दीतील एक १६ वर्षिय मुलगी घरी एकटीच असताना आरोपी विशाल अरुण मानके (२४) याने तिच्यावर बलात्कार केला. घटनेची तक्रार पीडिताच्या आई-वडिलांनी ठाण्यात केली आहे.
न्यायालयीन आदेशावरून कारवाई
अमरावती : त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६, लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याची कलम ६, आर.डब्ल्यू. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा कलम ३(१२) नुसार गुन्हा नोंदविला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी विशाल मानकेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. तेव्हापासून आरोपी कारागृहात आहे. बलात्कारानंतर पीडित मुलगी १३ ते १४ आठवड्याची गर्भवती राहिली. पीडित अल्पवयीन कुमारिका असल्यामुळे या प्रकरणात न्यायालयाने तीच्या गर्भपाताचे आणि भृ्रणाच्या डिएनए तपासणीचे आदेश लोणी पोलिसांना दिले आहे. त्यानुसार रविवारी मुलीच्या गर्भपाताची प्रक्रिया जिल्हा स्त्री रुग्णालयात पार पडली. हे भ्रूण सोमवारी नागपूरच्या न्याय वैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जाणार आहे. तूर्तास ते भ्रूण जिल्हा सामान्य रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात आले आहे. (प्रतिनिधी)