जारिदा येथे बँक ग्राहकांना अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:13 AM2021-02-11T04:13:55+5:302021-02-11T04:13:55+5:30
चिखलदरा तालुक्यातील चुरणी हे सर्वांत मोठे गाव आहे. येथील बँकेशी परिसरातील ४० ते ५० गावे जोडली गेली असून, हजारो ...
चिखलदरा तालुक्यातील चुरणी हे सर्वांत मोठे गाव आहे. येथील बँकेशी परिसरातील ४० ते ५० गावे जोडली गेली असून, हजारो खातेदारांची बँकेत दररोज पैसे काढणे व भरण्यासाठी झुंबड उडत असते. बँकेत श्रावण बाळ योजना, पीएम आवास योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, शबरी आवास योजना, शिष्यवृत्ती योजना, घरकुल योजना तसेच पीएम किसान योजनेचे पैसे ग्राहकांना बँकेच्या माध्यमातून मिळत असतात. बँकेत येणाऱ्या ग्राहकांसोबत कर्मचारी उद्धटपणे वागणूक करीत असतात. पासबूकवर नोंदी न देणे ग्राहकांशी मुजोरी,बँकेत तासंतास बसवून ठेवणे, म्हाताऱ्यांना आल्यापावली वापस करणे आदी प्रकार या बँकेत रोज पाहावयास मिळतात. त्यामुळे बँक कर्मचारी व ग्राहकाशी नेहमी छोट्या मोठ्या कारणावरून खटके उडत असतात. अशातच काही अनुचित प्रकार घडल्यास याला जबाबदार कोण, अशी चर्चा सुज्ञ नागरिक करीत आहे. या बेजबाबदार कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांसह पूजा आमले यांनी केली आहे.
..........…
माझ्या कामात कुठलीही चूक नाही. ग्राहकांना प्राप्त स्थितीनुसार हाताळले जाते.
- ओमप्रकाश मोहाळीकर, शाखा व्यवस्थापक, इंडियन बँक, जारिदा
................
माझ्या सर्कलमधील ग्रामस्थांना बँकेत त्रास होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करणार आहे .
- पूजा येवले, जिल्हा परिषद सदस्य