शेतकऱ्यांना महसूल कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 04:13 AM2021-04-21T04:13:04+5:302021-04-21T04:13:04+5:30
गतवर्षी झालेल्या गारपीट व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईचे अनुदान काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने चौकशीकरिता काही ...
गतवर्षी झालेल्या गारपीट व नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानभरपाईचे अनुदान काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने चौकशीकरिता काही शेतकरी गेले असता, नैसर्गिक आपती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी पंकज चव्हाण यांनी शेतकऱ्यांना आम्ही एवढेच कामे करावी का, तुम्ही तुमच्या तलाठ्याकडे चौकशी करा, असे सांगून सर्व शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली. त्याचवेळी पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले यांनी शेतकऱ्यांच्यावतीने विचारपूस केली असता, त्यांच्याशीदेखील आवाज चढवून बोलले गेले. या अधिकाऱ्याची शासनाने तडफातडफी बदली करावी, अशा आशयाचे निवेदन तहसीलदारांना व ना. बच्चू कडू यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी तालुक्यातील शेतकरी तसेच दिनेश आमझरे, विशाल आवारे, तृषांत कुरवाडे, प्रतीक खापरे, कैलाश नांदणे, राहुल आवारे उपस्थित होते.