एसीबी विभागाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 03:12 PM2019-01-29T15:12:53+5:302019-01-29T15:13:18+5:30

अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला  अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा  सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे.

ACB department has a fund of Rs. 10 lakhs | एसीबी विभागाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध 

एसीबी विभागाला दहा लाख रुपयांचा निधी उपलब्ध 

Next

- चेतन घोगरे  

अमरावती  -  अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ऐसीबी) विभागाला  अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्हा वार्षिक सर्वसाधारण सभा  सण २०१८- २०१९ मधील नावीन्यपूर्ण योजनेच्या उपक्रमातून दहा लक्ष रुपयांचा निधी प्राप्त करून देण्यात आला आहे.
या रकमेतून लाचलुचपत विभागाने यंत्रणा बळकट करण्यासाठी अत्याधुनिक साहित्याची खरेदी सुद्धा केली आहे.

अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला प्रभावी कार्यवाही करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचबरोबर तपास यंत्रणा बळकट करण्यासाठी अत्याधुनिक साहित्य खरेदी करता लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय आमरावती चे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करण्यात आला होता तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जिल्हा वार्षिक साधारण सभा २०१८-२०१९ सदर विषयाचा प्रस्ताव ठेवून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत दहा लक्ष रुपयाचा निधी एसीबी विभागाला उपलब्ध करून देण्यात आला. 

 या निधीतून अमरावतीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने परिक्षेत्रात येत असलेल्या पाच घटक कार्यालयातील अधिकार्याना भ्रष्टाचार निर्मूलनाकरिता सापळा कारवाई व तपास यंत्रणा बळकट करण्याकरिता साहित्य खरेदी करण्यात आले आहे, या मध्ये संगणक ५ रक्कम १ लाख ८५ हजार ,लॅपटॉप ८ रक्कम २ लाख ८८ हजार तसेच युपीएस २० नग,हार्डडिक्स १० नग,हेडफोन १०, प्रिंटर १०, स्कॅनर ५, सोनी वोईस रेकॉर्डर १२, अल्ट्रा व्हायलेट लैम्प १२, स्पाय वॉच,स्पाय पेन, व इतर म्हतवाच्या वस्तू,सदर वरील उपयोगी वस्तू लाच लुचपत विभागाच्या गेम पोर्टल निधीअंतर्गत उपलब्ध नसल्याने प्राप्त झालेल्या दहा लक्ष रुपयाच्या निधीतून उपयोगी वस्तू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून खरेदी करण्यात आले आहेत,

 
- प्रथम पुणे नंतर अमरावती 

सर्व प्रथम पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तेथील जिल्हाधिकारी यांच्या कडून नाविन्यपूर्ण योजनेतून १०लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला त्यानंतर अमरावती लाचलुचपत विभागाने त्यांच्या प्रस्तावाच्या आधारे अमरावतीला तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या कडून १० लक्ष मंजूर करून घेतले

Web Title: ACB department has a fund of Rs. 10 lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.