पावसाच्या दमदार आगमनाने आंतरमशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:12 PM2021-07-13T16:12:50+5:302021-07-13T16:13:14+5:30

Amravati News दोन दिवसांपासून पावसाने दमदार आगमन केल्याने कावली परिसरातील शिवारात आंतरमशागतीला वेग आल्याचे चित्र आहे.

Accelerated intercropping with heavy rains | पावसाच्या दमदार आगमनाने आंतरमशागतीला वेग

पावसाच्या दमदार आगमनाने आंतरमशागतीला वेग

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती : दोन दिवसांपासून पावसाने दमदार आगमन केल्याने कावली परिसरातील शिवारात आंतरमशागतीला वेग आल्याचे चित्र आहे.

मृग नक्षत्रांत दगा दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य लोपले होते. शेतकरी निराश झाला होता. यावर्षीही सोयाबीनला फाटा देत मोठ्या प्रमाणात कपाशीची पेरणी केली. परंतु, पावसाचा पत्त नसल्याने शेतकऱ्यांच्या क्हऱ्यावर चिंतेचे ढग दाटले होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून दमदार पावसाने आगमन सुरू केल्याने पुन्हा शेतकरी आपला आळस काढून शेतीच्या मशागतीला लागला आहे. तणनाशकाची फवारणी तसेच मजूर उपलब्ध झालेल्या शेतकऱ्यांनी निंदण-खुरपणी सुरू केली आहे.

Web Title: Accelerated intercropping with heavy rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती