दर्यापूर-बाभळी मार्गावर अपघात

By Admin | Published: November 11, 2016 12:32 AM2016-11-11T00:32:14+5:302016-11-11T00:32:14+5:30

सांगळुद येथून दर्यापूरकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी क्र. एमएच २७ वाय ८९०९ ने गुरुवारी दुपारी ३.५० च्या सुमारास अकोट आगारातील

Accident on Daryapur-Bawhali road | दर्यापूर-बाभळी मार्गावर अपघात

दर्यापूर-बाभळी मार्गावर अपघात

googlenewsNext

एक जखमी : एकाची प्रकृती अत्यवस्थ
दर्यापूर : सांगळुद येथून दर्यापूरकडे भरधाव येणाऱ्या दुचाकी क्र. एमएच २७ वाय ८९०९ ने गुरुवारी दुपारी ३.५० च्या सुमारास अकोट आगारातील बस क्र. एमएच ४० एन ९३२८ ला धडक दिली.
अमरावतीहून अकोटला जात असताना येथील बाभळीच्या मोठ्या पुलाजवळ दुचाकी चालकाने ओव्हरटेक करताना नियंत्रण सुटल्याने बसच्या समोरासमोर धडक दिली. यातील दुचाकीस्वार मिलिंद पातोडे (३०) व सत्यपाल तायडे (२३, दोघे रा. सांगळुद) हे गंभीर जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला आयसीयूमध्ये भरती करण्यात आले. अपघातातील बसला दर्यापूर पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले. पुढील तपास दर्यापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन गवारे व अन्य पोलीस करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Accident on Daryapur-Bawhali road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.