मध्यप्रदेशच्या देढतलाईजवळ अपघात; चार वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, मृत्युसंख्या सहावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2023 02:47 PM2023-02-02T14:47:27+5:302023-02-02T14:49:13+5:30
चार चाकीचा टायर फुटल्याने झाला अपघात, ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
नरेंद्र जावरे
अमरावती : मेळघाटच्या धारणीला लागून असलेल्या अकोट पफिसरातून काम करून गावी जाणाऱ्या मजुरांचा
मध्यप्रदेशातील देडतलाई शेखपुरा येथे बुधवारी दुपारी २;३० वाजता अपघात झाला होता. त्यात पाच जण ठार तर आठ जखमी झाले. तर, गुरुवारी चार वर्षे चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी खकणार पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून महाराष्ट्रातील पिकअप व्हॅनसह दोन्ही वाहनांचे चालक घटनास्थळावरून फरार आहेत.
दारासिंग श्रीराम (४ वर्ष) सुंदरबन असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. या अपघातात आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून सात जणांवर मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. ध्यप्रदेशच्या बराणपूर खंडवा बैतूल जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आदिवासी मजूर रोजगारासाठी अमरावती अकोला बुलढाणा परिसरात शेतीकाम, कापणीसह इतर कामांसाठी येतात. दोन महिन्यांपूर्वीसुद्धा करजगाव येथून जाणाऱ्या चार चाकी वाहनाची खासगी बस सोबत धडक झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेतील सर्व मृतक मध्यप्रदेशातील होते.
चार चाकीचा टायर फुटल्याने अपघात
अकोट परिसरातून निघालेल्या एम एच ४८ टी ४५०९ क्रमांकाची चार चाकी पिकअप मजुरांना घेऊन जात असताना उसाच्या ट्रकल ओव्हरटेक करताना वळणावर टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती खकणार पोलिसांनी लोकमत शी बोलताना दिली त्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला तर सात जखमींवर उपचार सुरू आहेत
ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दोन्ही चालक फरार
भीषण अपघातानंतर ट्रक आणि पिकअप वाहनाचा चालक दोघेही फरार आहेत घटनेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा ते घटनास्थळी किंवा पोलिस ठाण्यात पोहोचले नाहीत खकनार पोलिसांनी एम पी शून्य नऊ के डी १७ २३ क्रमांकाच्या ट्रक चालका विरुद्ध २८९, ३३७, ३०४ अ अन्वये गुन्हा दाखल केला असल्याची माहिती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप सिंग यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली
अपघातात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून उर्वरित जखमींवर उपचार सुरू आहे ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे वळणावर चार चाकी चा टायर फुटल्याने हा अपघात झाला त्या वाहनाच्या मालकासह चालकाचा शोध सुरू आहे.
- संजय पाठक ठाणेदार, खकणार मध्य प्रदेश