पश्चिम बंगालच्या इसमाचा आकस्मिक मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:11+5:302021-04-16T04:13:11+5:30
अमरावती : पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या एका ५७ वर्षीय इसमाचा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील कॅन्टीनमध्ये बुधवारी आकस्मिक मृत्यू झाला. ...
अमरावती : पश्चिम बंगालचा रहिवासी असलेल्या एका ५७ वर्षीय इसमाचा हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील कॅन्टीनमध्ये बुधवारी आकस्मिक मृत्यू झाला. केस्टा सुफल बेरा (५७ रा. वेस्ट बंगाल, ह.मु. एचव्हीपीएम) असे मृताचे नाव आहे. १४ एप्रिल रोजी केस्टा बेरा यांची एचव्हीपीएमच्या कॅन्टीनमध्ये अचानक प्रकृती बिघडली. त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. माहितीवरून राजापेठ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
0000000000000000000000000000000
नंदा मार्केटजवळ तडीपाराला अटक
अमरावती : राजापेठ हद्दीतील नंदा मार्केटजवळ पोलिसांनी एका तडीपार आरोपीला अटक केली. कपील रमेश भाटी (२३ रा. बेलपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी छोटेलाल यादव यांचे पथक पेट्रोलिंगवर असताना, त्यांना तडीपार कपील भाटी फिरताना दिसला. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, तो विना परवानगी शहरात दाखल झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन, त्याच्याविरुध्द कलम १४२ अन्वये गुन्हा नोंदविला.
000000000000000000000000000000000
जुन्या वादातून चाकूने हल्ला
अमरावती : जुन्या वादातून तरुणावर चाकूने हल्ला केल्याची घटना बुधवारी जेवडनगरात घडली. अंकुश प्रभाकर बगेकर (३०रा. जेवडनगर) हा सेदानी किराणाजवळ उभा असताना, तेथे ऋषिकेश खानझोडे (रा. महादेवखोरी) आणि रितेश वानखडे (रा. जेवडनगर) आले. त्यांनी जुन्या वादातून अंकुशची कॉलर पकडून त्याच्यावर चाकूने वार केला. या घटनेची तक्रार अंकुशने राजापेठ ठाण्यात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000
विनायकनगरातून दुचाकी लंपास
अमरावती : विनायक नगरातून तरुणाची दुचाकी चोराने लंपास केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली. मनोज रामदास खोटे (३० रा. धामणगाव रेल्वे, ह.मु. विनायकनगर) यांनी एमएच २७ एडब्ल्यू ४९२५ या क्रमांकाची दुचाकी विनायकनगरातील घरासमोर उभी केली होती. १४ एप्रील रोजी त्यांना ती दुचाकी दिसली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु दुचाकी दिसली नाही. त्यामुळे अखेर त्यांनी या घटनेची तक्रार गाडगेनगर पोलिसात नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला.
00000000000000000000000000000
चाकू हातात घेऊन मुलीचा पाठलाग
अमरावती : चाकू हातात घेऊन मुलीचा पाठलाग करणाऱ्या एका इसमाविरुध्द गाडगेनगर पोलिसांनी बुधवारी विनयभंगाचा गुन्हा नोंदविला. चंद्रमणी शामसुंदर तिवारी (५५ रा. रतनगंज) असे आरोपीचे नाव आहे. एक महिला तिच्या मुलीसोबत घरी पायदळ जात असताना, आरोपी चंद्रमणी चाकू घेऊन त्यांचा पाठलाग करीत होता. हा प्रकार पाहून पिडित महिलेने गाडगेनगर ठाणे गाठून तक्रार नोंदविली.