नागपूर करारानुसार आणि विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरातच व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2021 08:44 PM2021-11-23T20:44:59+5:302021-11-23T20:45:36+5:30

Amravati News या वर्षीचे हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपुरात घ्यावे, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

According to the Nagpur Agreement, the winter session should be held in Nagpur to resolve the Vidarbha issue | नागपूर करारानुसार आणि विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरातच व्हावे

नागपूर करारानुसार आणि विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी हिवाळी अधिवेशन नागपुरातच व्हावे

googlenewsNext

 

अमरावती : नागपूर करारानुसार आणि विदर्भाचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपुरातच होते. त्यामुळे या वर्षीचे हिवाळी अधिवेशनसुद्धा नागपुरात घ्यावे, अशी मागणी बडनेराचे आमदार रवी राणा यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया झाली असून, त्यांची प्रकृती ठीक नाही, अशी माहिती आहे. त्यामुळे या वर्षीचे हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीचे कारण पुढे करून अधिवेशन नागपूर येथे होऊ नये, यासाठी राजकीय डाव रचला जात आहे. मात्र, ठाकरे यांनी अन्य सहकारी मंत्र्याकडे अधिवेशनापुरती मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवून नागपूर येथेच अधिवेशन घ्यावे, अशी मागणी राणा यांनी केली.

Web Title: According to the Nagpur Agreement, the winter session should be held in Nagpur to resolve the Vidarbha issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.