मांजरखेडच्या पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी केली खाते पुस्तक, पैशांची अफरातफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:16 AM2021-08-20T04:16:51+5:302021-08-20T04:16:51+5:30
खातेदारांचे व ग्रा.पं. चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन खातेदारांचे व ग्रा.पं. चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड ...
खातेदारांचे व ग्रा.पं. चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
खातेदारांचे व ग्रा.पं. चे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
चांदूर रेल्वे : तालुक्यातील मांजरखेड (कसबा) येथील पोस्टाचे कर्मचाऱ्यांनी काही खातेदारांचे खाते पुस्तक व पैशांची अफरातफर केल्याचे निवेदन मंगळवारी खातेदारांनी व ग्रा.पं.कडून आमदार प्रताप अडसड यांच्या समक्ष स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले.
चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड (क.) येथील पोस्ट कर्मचाऱ्यांनी मांजरखेड व बासलापूर येथील काही नागरिकांचे पोस्टाचे खातेपुस्तक व पैशाची अफरातफर केली आहे. खाते पुस्तकामधील रक्कम परस्पर काढून अफरातफर केल्याचे खातेदारांनी निवेदनात नमूद केले आहे. त्याबाबत खातेदारांना कोणतीही सूचना दिली नसल्याचे सांगितले. याविषयीचे गावातील पोस्टमास्तर यांच्याकडे गेले असता पोस्टाचे कर्मचाऱ्यांना शोधा, याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करा असे म्हटल्याचे खातेदारांनी म्हटले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून खातेदारांना त्यांची रक्कम व खातेपुस्तक देण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी सरपंच दिलीप गुल्हाने, उपसरपंच किरण देशमुख, तसेच माजी उपसरपंच अमोल देशमुख, सदाशिव लव्हाळे, शेख रफीक, दामोदर मुळे, किशोर फोपसे, रवींद्र कुंभलकर, शेख नईम, प्रल्हाद चौकडे, शेख करीम, चंद्रकला नेवारे, जयश्री पिंपळकर, रजनी सोनवणे, ज्योती जवंजाळ, मनोज गोंगे, नंदा लोसेकर, धीरज लोसेकर, बबन भांडेकर, संतोष सांभारे, सुरेश कावलकर, अजय हटवार आदींची उपस्थिती होती.
190821\img-20210819-wa0008.jpg
photo