अपघात प्रकरणातील आरोपीला छत्तीसगढमधून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:28 AM2021-09-02T04:28:13+5:302021-09-02T04:28:13+5:30
वरूड : तालुक्यातील उमरखेडजवळ एका ऑटोरिक्षाला धडक देऊन अज्ञात वाहनचालक फरार झाला होता. अपघातग्रस्त ऑटोरिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. ...
वरूड : तालुक्यातील उमरखेडजवळ एका ऑटोरिक्षाला धडक देऊन अज्ञात वाहनचालक फरार झाला होता. अपघातग्रस्त ऑटोरिक्षाचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. बेनोडा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीला तब्बल २० दिवसानंतर छत्तीसगढमधून अटक केली तसेच वाहन जप्त केले.
बेनोडा पोलीस ठाण्याच्या हाद्दीतील उमरखेड गावानजीक वरूड-मोर्शी रस्त्यावर ८ ऑगस्टला हिवरखेड येथील ऑटोरिक्षा (एमएच २७ एआर १२४३) चालक सदानंद वसंतराव गुल्हाने (४५, रा. हिवरखेड) जात असताना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. ऑटोचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ठाणेदार मिलिंद सरकटे, पोलीस उपनिरीक्षक दिलीप श्रीराव, कॉन्स्टेबल अनिल भोसले, संदीप लेकुरवाळे, विवेक घोरमाडे या पथकाने वरूड-मोर्शी येथून त्या दिवशी ये-जा करणाऱ्या वाहनांचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून शोध घेतला असता ते वाहन छत्तीसगढ राज्यातील मौज कदइ (ता. धामधा जि. दुर्ग) येथील असल्याचे सिद्ध झाले. बेनोडा पोलिसांच्या पथकाने सीजी ०७ सीसी ५९८९ क्रमांकाचे वाहन आणि चालकाला ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास ठाणेदार मिलिंद सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेनोडा पोलीस करीत आहेत.