प्रवासादरम्यान दागिने उडविणारा आरोपी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:28+5:302021-08-14T04:16:28+5:30
१२ तासात चोरीचा उलगडा : शहर कोतवाली पोलिसांची यशस्वी कारवाई पान ३ सेकंड लिड अमरावती : प्रवासादरम्यान एका महिलेचे ...
१२ तासात चोरीचा उलगडा : शहर कोतवाली पोलिसांची यशस्वी कारवाई
पान ३ सेकंड लिड
अमरावती : प्रवासादरम्यान एका महिलेचे २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या आरोपीच्या शहर कोतवाली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीकडून चोरी गेलेला ऐवज जप्त करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी शहर कोतवाली पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली.
महानंदा कृष्णराव अहिरकर (५७, रा. जयदुर्गा बिछायत केंद्रजवळ, आदर्शनगर) या बहिणीकडे कार्यक्रम असल्यामुळे गोपगव्हाण येथे गेल्या. अमरावतीला घरी परत येत असताना त्यांंच्याकडील सोन्याचा गोफ १५ ग्रॅम, चेन (पेंडाॅल) १४ ग्रॅम, नेकलेस १६ ग्रॅम, झुमके १२ ग्रॅम, नथ दोन ग्रॅम अशी एकूण किंमत २ लाख ४२ हजार ६०० रुपयांचे साहित्य प्रवासादरम्यान अज्ञात चोराने चोरून नेल्याचे फिर्यादीला गांधी चौक अमरावती येथे लक्षात आले. शहर कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करून तपासात घेतला. गुन्ह्याच्या तपासादरम्यान ऑटोरिक्षाचालक अबितखाँ (३७, रा. भातकुली) याला ताब्यात घेऊन सखोल विचारपूस केली असता, त्याने गुन्ह्यातील नमूद वर्णनाचा माल चोऱ्रल्याची कबुली दिली. त्याच्याकडून तो जप्त करण्यात आला. कोतवालीचे ठाणेदार राहुल आठवले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद राऊत, उपनिरीक्षक श्रीकांत नारमोड, सहायक उपनिरीक्षक रवींद्र काळे, नायक कॉन्स्टेबल जुनेद खान, शैलेश लोखंडे, कॉन्स्टेबल आशिष विघे, पंकज अंभोरे, उमाकांत आसोलकर यांनी तपास करून गुन्हा १२ तासांत उघड केला.
——————-