आरोपींवर 'मोक्का' नाही

By admin | Published: August 30, 2015 12:07 AM2015-08-30T00:07:37+5:302015-08-30T00:07:37+5:30

अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली.

The accused do not have 'mukka' | आरोपींवर 'मोक्का' नाही

आरोपींवर 'मोक्का' नाही

Next

अमित बटाऊवाले खून प्रकरण : पोलीस अधीक्षकांची माहिती
अमरावती/अचलपूर : अमित हत्याकांड घडले त्याच दिवशी त्यातील आरोपींना मोक्का लावता येतो का, याची आपण माहिती घेतली. पण मोक्का लावण्याएवढे त्यांचेवर गुन्हे दाखल नसल्याने मोक्का लावणे कायद्यात बसत नाही, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांनी ‘लोेकमत’शी बोलताना दिली.
रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची भरदिवसा रस्त्यावर हत्या केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास पहिलीच शांतता समितीची सभा अचलपूर पोलीस ठाण्यात झाली. त्यासाठी लखमी गौतम येथे आले होते. त्यानंतर त्यांची लोकमत प्रतिनिधीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिलीत. यावेळी अनेक नेत्यांनी त्यांचेशी भेटायला गर्दी केली होती. तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी अमितच्या घरी जाऊन त्याची आई अनिता मोहन बटाउवाले ह्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी माझा मुलगा अमित याच्या हत्याऱ्यांवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी, अशी मागणी केली होती. तेथे जमलेल्या लोकांनीही हीच मागणी लावून धरली होती. सदर बारुद गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी यासाठी शहरात स्वाक्षरी मोहीम सुरु झाल्याची माहिती आहे.
गौतम म्हणाले की, अजूनही अमित हत्याकांडातील दोन आरोपी फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. ते जर सापडलेच नाही तर त्यांच्या मालमत्ते संदर्भात आम्हाला विचार करावा लागेल. तसेच काँग्रेसचे स्थानिक नेते अज्जूभाई ह्यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाला गौतम ह्यांनी उत्तर देतांना सांगितले की, गुन्हेगारावर कारवाई ही केलीच जाईल, त्याची हयगय नाही. पण सामान्य माणसांना त्रास होणार नाही. त्यांनी घाबरु नये. कुठलीही समस्या अडचण असेल तर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. कुठलीही भीती बाळगू नये.
शांतता समितीच्या सभेत मार्गदर्शन करताना गौतम आपल्या भाषणातून म्हणाले की, शाळा व महाविद्यालयांजवळ विद्यार्थिनीची छेडखानी होणार नाही. याची पोलीस विशेष दक्षता घेत आहे. विद्यार्थ्यांच्या दुचाकी वाहन परवाना तपासणी सुरु असून ज्यांच्याजवळ परवाना नाही त्यांच्या आई-वडिलांना बोलावून दंड करा तसेच शहरात शांतता व सलोखा ठेवा यासाठी ज्येष्ठ नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. ज्यांचेवर गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तींना शांतता समितीतून काढण्यात येणार आहे. येणारा कुठलाही सण उत्साहात, शांततेत व एकोप्याने साजरा करा असेही आवाहन त्यांनी शेवटी केले. (प्रतिनिधी)
महसूल विभाग अजूनही झोपेत
अमित बटाऊवाले ह्यांची हत्या रेती तस्करांनी केली. अचलपूर तालुक्यात कोट्यावधी रुपयाची रेती तस्करी झाली आहे. रेती तस्करापासून आपल्या जिवाला धोका आहे. परंतू संबंधीत महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी तुटपूंजी कारवाई करत बनवाबनवी केली. संबंधीत अधिकाऱ्यांनी लाखो रुपयाचा मलीदा खाल्ला त्यासाठी उपविभागीय अधिकारी व तहसिलदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी युवा स्वाभिमान संघटनेचे विधानसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख उपेन बछेल ह्यांनी आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर ह्यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली. तसेच बटाउवाले कुटूंबियांना १० लाख रुपयाची शासनाने मदत करावी असेही निवेदनात नमुद केले आहे. निवेदनावर रविंद्र गवई, चेतन बाळापूरे, विठ्ठल पाटील, मंगेश सदांशिव, सुभाष देशमुख, प्रशांत अग्रवाल, चिंटू अग्रवाल, बजरंग हेकडे, ऋषी नंदवंशी ह्यांचे सह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Web Title: The accused do not have 'mukka'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.