कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार

By प्रदीप भाकरे | Published: February 4, 2024 04:59 PM2024-02-04T16:59:35+5:302024-02-04T16:59:52+5:30

ट्रकसमोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रकचालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांबविण्यात आली होती.

Accused in Koundanyapur robbery jailed in just six hours Four arrested, two absconding | कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार

कौंडण्यपुरच्या दरोड्यातील आरोपी अवघ्या सहा तासात जेरबंद; चार अटक, दोघे फरार

अमरावती: ट्रकसमोर दोन दुचाकी आडव्या करून ट्रकचालकाला शस्त्राने मारहाण करून त्याच्याकडील ९२ हजार रुपये रोख लांबविण्यात आली होती. ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ७.३० च्या सुमारास कौंडण्यपूरनजिक दरोड्याची ती घटना घडली होती. त्याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखा व कुऱ्हा पोलिसांनी अवघ्या सहा तासात त्या गंभीर घटनेचा उलगडा केला. अटक आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. चांदूर रेल्वे येथील प्रमोद भोयर (४२) हे एमएच २७ बीएक्स ९५६० या ट्रकने आर्वी येथून ढेप  घेऊन चांदुर रेल्वेकडे येत असतांना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ७.३० दरम्यान कौंडण्यपूरजवळ त्यांच्या वाहनाच्या मागील बाजुने दोन दुचाकीवर तीन ते चार इसम आले.  

त्यांनी  शिविगाळ करून ट्रक थांबविण्यास सांगितला. परंतू भोयर यांनी ट्रक न थांबवता पुढे नेला असता आरोपींपैकी एकाने त्याची दुचाकी पुढे नेऊन ट्रकसमोर आडवी उभी केली. त्यामुळे भोयर यांना आपले वाहन थांबवावे लागले. त्यावेळी दोन दुचाकी वरून आलेल्या आरोपींनी  ट्रकच्या कॅबिनमध्ये शिरत भोयर यांना लाथा-बुक्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण सुरू केली. त्याचवेळी आरोपींनी त्यांच्या खिशातील रोख ९२ हजार रुपये जबरीने हिसकावले. तथा आरोपी दुचाकीने पळुन गेले. घटनेचे अनुषंगाने कु-हा येथे जबरी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.
 
चार पथके आणि सीसीटीव्ही फुटेज
पोलीस अधीक्षक विशाल आनंद व अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमार कुमावत यांनी मार्गदर्शन करून तपासासाठी कु-हा ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके नेमली.भोयर यांनी आर्वी येथून ज्या ठिकाणाहून ढेप विकत घेऊन ट्रकमध्ये भरली, त्याठिकाणासह मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तसेच ढेप भरणाऱ्या मजुरांची कसून विचारपुस केली. त्यावेळी पोलिसांना मजुरांपैकी नितेश उध्दवराव पुरी (२५, रा. वर्धमनेरी, ता. आर्वी) याचेवर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले. 
 
आरोपी नितेशने दिली कबुली
साथीदार करण मुगबेलसिंग बावरी (२६), सुरज पद्माकर थुल (२१), गोपाल किसनराव दखणे (२३), विकास मुंद्रे , सुरज गडलिंग (सर्व रा. आनंदवाडी, ता. तिवसा) यांच्या मदतीने तो गुन्हा केल्याची कबुली नितेश पुरी याने दिली.  कबुलीनुसार नितेश पुरीसह करण, सुरज व गोपालला अटक करण्यात आली. तर, विकास मुंद्रे व सुरज गडलिंग हे फरार आहेत. एसपी विशाल आनंद, एएसपी पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात कुऱ्हाचे ठाणेदार अनुप वाकडे, सहायक निरिक्षक सचिन पवार, उपनिरिक्षक संजय शिंदे, कुऱ्हा येथील अंमलदार अनिल निंघोट, हेमंत डहाके, सागर निमकर, दर्पण मोहोड यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Accused in Koundanyapur robbery jailed in just six hours Four arrested, two absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.