अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपीला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:16 AM2021-08-15T04:16:09+5:302021-08-15T04:16:09+5:30
अमरावती : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरेश लालजी सरकटे (४४) असे शिक्षा ...
अमरावती : अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सुरेश लालजी सरकटे (४४) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २३ नोव्हेंबर २०१९ रोजी माहुली जहागीर येथे घडली होती.
विधी सूत्रांनुसार, २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी आरोपी तिच्या घरात शिरला आणि त्याने तिचा विनयभंग केला. त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून माहुली जहागिर पोलिसांनी आरोपी सुरेश सरकटेविरुद्ध गुन्हा नोंदवून त्याला अटक केली.
बॉक्स
अशी आहे शिक्षेची तरतूद
माहुली जहागीर ठाण्याचे तपास अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील शशीकिरण पलोड यांनी एकूण तीन साक्षीदार तपासले. दोन्ही पक्षांच्या युक्तिवादानंतर आरोपीचा दोष सिद्ध झाला. अतिरिक्त सह सत्र न्यायाधीश एस.जे. काळे यांच्या न्यायालयाने आरोपीला कलम ८ पोक्सोप्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी, तीन हजारांचा दंड व दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.