खुनाचे आरोपी १२ तासाच्या आत गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:50+5:302021-08-14T04:16:50+5:30

प्रशिक बारसे, विशाल गडलिंग व कपिल पांडे (तिघेही रा. पंचशिलनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना अमरावती शहरातूनच अटक ...

Accused of murder disappears within 12 hours | खुनाचे आरोपी १२ तासाच्या आत गजाआड

खुनाचे आरोपी १२ तासाच्या आत गजाआड

Next

प्रशिक बारसे, विशाल गडलिंग व कपिल पांडे (तिघेही रा. पंचशिलनगर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांना अमरावती शहरातूनच अटक करण्यात आली. शनिवारी त्यांना न्यायालयात उपस्थित केले जाणार आहे. महादेव खोरी परिसरातून घटनेच्या काही वेळातच आरोपींची दुचाकी हसतगत करण्यात आली होती. पीसीआरदरम्यान, घटनेत वापरलेल्या चाकू व अन्य साहित्य जप्त करण्याकडे पोलिसांचा कल असेल. यशोदानगर क्रमांक ४ येथील डॉ. करवा गल्लीमधील मेश्राम यांच्या घरासमोर अनिकेत कोकणे याला गाठून आरोपी प्रशिक बारसे व विशाल गडलिंग यांनी

त्याच्या गळ्यावर, पोटावर, मांडीवर चाकुने वार करून जीवानिशी ठार केले होते. अल्पवयीनासह कपिल पांडे ज्या दुचाकीने आले होते. त्या दुचाकीवर हल्लेखोर पळून गेले. दरम्यान, आरोपी प्रशिक बारसेवर आधी दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

म्हणून केला होता खून

मृत अनिकेतचे वडिल ज्ञानदीप कोकणे (५०,संजय गांधीनगर नं. १) यांच्या तक्रारीनुसार, आरोपी प्रशिक बारसेचा भाऊ बंटी बारसे हा मुलीला त्रास देत होता. अनिकेतने त्याला समजावून सांगितल्यानंतरही त्रास देणे सुरूच होते. त्यामुळे अनिकेतने बंटी बारसेचा खून केला होता. त्याचा वचपा म्हणून प्रशिक बारसे व विशाल गडलिंग यांनी त्याचा पाठलाग करून, त्याला पोर्चमध्ये पाठून त्याचा खून केला.

कोट

अनिकेत कोकणेच्या हत्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तर एका अल्पवयीनाला देखील ताब्यात घेण्यात आले. मृताच्या पित्याच्या तक्रारीवरून गुरूवारीच हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

तपासाला वेग दिला आहे.

नितीन मगर,

तपास अधिकारी, फ्रेजरपुरा

Web Title: Accused of murder disappears within 12 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.