नांदेड येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अमरावतीत पिस्तुलासह अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 03:05 PM2020-08-19T15:05:37+5:302020-08-19T15:06:05+5:30

नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली.

Accused in Nanded robbery case arrested with pistol in Amravati | नांदेड येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अमरावतीत पिस्तुलासह अटक

नांदेड येथील दरोडा प्रकरणातील आरोपींना अमरावतीत पिस्तुलासह अटक

Next
ठळक मुद्देराजापेठ पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्सवर रिवॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकून पसार झालेल्या तीन आरोपींना अमरावती येथील दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीतून मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास पिस्तुलासह राजापेठ पोलिसांनी अटक केली.
पोलीससूत्रानुसार, वीरसिंग बसरुसिंग सरदार (२४, रा. बडपुरा, गुरुव्दारा गेटजवळ नांदेड), शुभम ओमप्रकाश जाधव (२२, रा. शिवशक्तीनगर, नांदेड), अनिकेत बालाजी सूर्यवंशी (२०, रा. नवामोंढा साठे चौक दत्तनगर, नांदेड), अशी दरोड्यातील आरोपींची नावे आहेत. राजापेठ पोलिसांनी त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे २० हजार रुपये किमतीची एक देशी बनावटीची पिस्तुल, बॅरलमध्ये फायर झालेले एक काडतूस, १६०० रुपये किमतीच्या मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतूस, तसेच एक लाकडी मूठ असलेले धारदार व टोकदार खंजीर, तसेच विना क्रमांकाची ५० हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली.

सदर आरोपींनी  मुक्तेश्वर शंकरराव वाहाने (४२, रा. दत्तनगर नांदेड यांचे नांदेड शहरातील स्वामी समर्थ ज्वेलर्समध्ये २९ जुलै २०२० रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आरोपी वीरसिंग व त्याच्या दोन साथीदारांनी दुचाकीवर येऊन रिव्हॉल्वरच्या धाकावर १५० ग्रॅम सोने, तसेच नगदी १० हजार रुपये असा एकूण ६ लाख ८५ हजारांचा ऐवज जबरीने नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर ठाणे नांदेड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३९४, ३४ सहकलम ४, २५ आर्म अक्टनुसार गुन्हा नोंदविला. पसार आरोपींचा शोध सुरू असतानाच मंगळवारी अमरावती पोलिसांना आरोपी शहरात येत असल्याची माहिती मिळाली. त्यांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

Web Title: Accused in Nanded robbery case arrested with pistol in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.