तोंगलाबाद येथील अपघात प्रकरण चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:12 AM2021-09-25T04:12:08+5:302021-09-25T04:12:08+5:30

पोलीस सूत्रांनुसार, मिलिंद रामचंद्र तायडे (५५, रा. टीटीनगर, अमरावती) यांनी फिर्याद नोंदविली. मिलिंद तायडे हे मुलगा व पत्नीसमवेत एम ...

Accused in Tongalabad case filed against four-wheeler driver | तोंगलाबाद येथील अपघात प्रकरण चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

तोंगलाबाद येथील अपघात प्रकरण चारचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Next

पोलीस सूत्रांनुसार, मिलिंद रामचंद्र तायडे (५५, रा. टीटीनगर, अमरावती) यांनी फिर्याद नोंदविली. मिलिंद तायडे हे मुलगा व पत्नीसमवेत एम एच १४ व्ही आर ८९७ क्रमांकाच्या चारचाकीने अमरावतीहून दर्यापूर मार्गे अकोल्याला निघाले होते. ते १० सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या आवाहनाला आरोपीची कार धडकली. यामुळे त्यांच्या छातीच्या पासोड्या फॅक्चर झाल्या आणि मुलाच्या मणक्या ची गादी सरकली व उजव्या पायाला फ्रॅक्चर झाले. पत्नीला मुका मार लागला आहे. याप्रकरणी दर्यापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

---------------

कातखेड येथून बोकडाची चोरून मासविक्री

येवदा : नजीकच्या कातखेड येथे राजेंद्र वानखडे (५०) यांच्या वाड्यातील बोकूड रोहन ढोके (२२, रा. उंबरी बाजार) याने लंपास केला. ते कापून मांस विक्री केल्याची फिर्याद येवदा पोलीस ठाण्यात नोंदविली. पोलिसांनी रोहनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

-------------

शुल्लक कारणावरून पत्नीला बदडले

धामणगाव रेल्वे : तालुक्यातील कासारखेड येथे स्वयंपाकाला उशीर झाला म्हणून पत्नीला काठीने बदडले. पोलीस सूत्रांनुसार आकाश अनिल साखरे (२८) असे आरोपी पतीचे नाव आहे. २० सप्टेंबर रोजी ही घटना घडली. त्याने कामावर जाणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पत्नीने स्वयंपाकाला उशीर केला. मात्र, त्याने डबा मागितला आणि उशीर होत असल्याबद्दल शिवीगाळ होत असतानाही स्वयंपाक करीत असल्याची कुरकुर पत्नीने करताच अनिलने काठीने मारून तिला जखमी केले. जीवे मारण्याची धमकी दिली. दत्तापूर पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Accused in Tongalabad case filed against four-wheeler driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.