अचलपूर बाजार समिती ई- बाजार व्यवहारात पिछाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:10 AM2021-05-28T04:10:23+5:302021-05-28T04:10:23+5:30
कामकाज असमाधानकारक असमाधानकारकचा फटका : कामकाजावर ताशेरे, पणन मंडळाचा ठपका पान २ ची बॉटम फोटो पी २७ अचलपूर ...
कामकाज असमाधानकारक
असमाधानकारकचा फटका : कामकाजावर ताशेरे, पणन मंडळाचा ठपका
पान २ ची बॉटम
फोटो पी २७ अचलपूर
परतवाडा :- अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समिती ई- बाजार व्यवहारात पिछाडीवर तसेच मागे आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी या ई-नाम बाबतच्या कामकाजावर ताशेरे ओढले आहेत. असमाधानकारकतेचा ठपका त्यांनी बाजार समितीवर ठेवला आहे.
राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रकल्पांतर्गत अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ई- लिलाव पद्धती राबविण्यात आली नाही. एकाही लॉटचे ई-पेमेंट केले गेले नाही. ई-पेमेंटची संख्या आणि टक्केवारी शून्य असल्याचे पणन मंडळाने म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला ई-नाम कामकाज बाबत २८ ऑगस्ट २०२० ला एक पत्र दिले आहे. ई-नामच्या कार्यप्रणाली नुसार सर्व शेतमालाची इनगेट एन्ट्री, असेइंग (प्रयोगशाळा अहवाल),ई- ऑक्शन, ई-पेमेंट व आऊट गेट एन्ट्री करणे बंधनकारक आहे. केंद्र व राज्य शासन सातत्याने सदर कामकाजात सुधारणा करणेबाबत सूचना देत आहे.
अचलपूर बाजार समिती अंतर्गत जून २०२० मध्ये शेतमालाची एकूण आवक व त्या प्रमाणात झालेली इनगेट एन्ट्री (क्विं), शेतमालाची एकूण आवक व त्या प्रमाणात झालेले ई-ऑक्शन (क्विं),इन गेट एन्ट्री प्रमाणे तयार झालेले एकूण लॉट, इन गेट एन्ट्री लॉट व त्या प्रमाणात असेइंग (प्रयोगशाळा अहवाल), ई-लिलावासाठी तयार केलेले लॉट, ई- लिलाव केलेले एकूण लॉट, ई- पेमेंट केलेले लॉट, शून्य असल्याचे त्या पत्रात नमूद आहे. हे संपूर्ण कामकाज असमाधानकारक असल्याचेही महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
बॉक्स
प्रकल्पच दुर्लक्षित
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने हा राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम प्रकल्प २०१६ मध्ये सुरू केला. प्रकल्पाच्या पहिल्याच टप्प्यात अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश केला गेला. या बाजार समितीत ई-नाम कार्यप्रणाली नुसार आलेल्या शेतमालाची आवक गेट एन्ट्री, लॉट मॅनेजमेंट, शेतमालाची गुणवत्ता तपासणी, ई- लिलाव, शेतमालाचे वजन, सेल ॲग्रीमेंट, सेल बिल व शेतकऱ्यांना ऑनलाईन पेमेंट करण्याचे अंतर्भूत होते. पण अचलपूर बाजार समिती अंतर्गत हा नाम प्रकल्प दुर्लक्षित असल्याचे पणन मंडळाच्या शेऱ्यावरून दिसून येते.