अचलपूर बनले शिक्षणाचे माहेरघर, १२०० कोटींचा निधी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2024 11:21 AM2024-11-15T11:21:20+5:302024-11-15T11:21:59+5:30

जिल्हा परिषद शाळांचा कायापालट, बच्चू कडू यांचा पुढाकार

Achalpur became the home of education, a fund of 1200 crores | अचलपूर बनले शिक्षणाचे माहेरघर, १२०० कोटींचा निधी

Achalpur became the home of education, a fund of 1200 crores

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
आमदार बच्चू कडू यांनी अचलपूर मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांचे रूपडे पलटून कायापालट करण्याचा निर्णय घेतला. सोबतच या शाळांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्याचा निश्चय करीत त्यांनी सरकारकडून तब्बल १२०० कोटींचा निधी खेचून आणत अचलपूर, चांदूर बाजार या दोन्ही तालुक्यांतील शाळांचा कायापालट करण्यात यश मिळविले. परिणामी रूपडे पालटलेल्या शाळेत अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्याने साहजिकच या शाळांमधील पटसंख्यादेखील वाढली आहे. याचे संपूर्ण श्रेय बच्चू कडू यांना जात असून, शिक्षणाबद्दल त्यांनी दाखविलेल्या आस्थेबद्दल पालकांनी त्यांचे आभार मानले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनासुद्धा शहरातील इंग्रजी शाळांप्रमाणे दर्जेदार शिक्षण मिळावे, या उदात्त हेतूने ग्रामीण भागातील शाळांचा कायापालट करण्याचा ध्यास बच्चू कडू यांनी घेतला. त्यानुसार तालुक्यातील शाळेच्या इमारतींसोबत त्या शाळामध्ये इंटरनेट, कॉम्पुटर, टॅबसह स्पर्धा परीक्षेची पुस्तके पुरविण्यात आली असल्याने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांचा दर्जा वाढला आहे. 


ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी शाळेच्या शैक्षणिक वातावरणाप्रमाणे शिक्षण मिळावे, याकरिता आ. बच्चू कडू यांनी सातत्याने प्रयत्न चालविले आहेत. अचलपूर मतदारसंघ हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे, ज्याला सध्या 'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून ओळखले जात आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे या मतदारसंघातील सरकारी शाळांचा (जिल्हा परिषद शाळा) होत असलेला कायापालट या बदलाच्या केंद्रस्थानी आहे. अचलपूरचे आमदार बच्चू कडू ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. 


बच्चू कडू यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेता यावे, याकरिता अनेक शाळांना कॉम्प्युटर, टॅब, इंटरनेट सेवा, विज्ञान प्रयोगशाळा, अन्य आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रेरणा मिळत आहे. बच्चू कडू यांचे शिक्षण क्षेत्रातले योगदान फक्त शाळांच्या विकासापर्यंतच मर्यादित नाही. त्यांनी 'सर्वांसाठी शिक्षण' हे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. यासाठी त्यांनी समाजातील दुर्बल आणि गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. 


अचलपूर, चांदूर बाजार तालुक्यात शैक्षणिक क्रांती 
आ. बच्चू कडू यांच्या प्रयत्नांमुळे अचलपूर मतदारसंघातील शाळांचा इमारती, शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी १२०० कोटी रुपये निधी खर्च करण्यात आले आहे. यामुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट झाला आहे आणि या बदलामुळे अचलपूरला 'शिक्षणाचे माहेरघर' म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. या शैक्षणिक क्रांतीमुळे विद्याथ्यर्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होत आहे आणि ग्रामीण भागातील लोकांचा विश्वास वाढत आहे.


मराठी शाळांसह उर्दू शाळांचा केला विकास 
बेलोरा - ४७.५० लक्ष, शिरजगांव कसबा ६४.६५ लक्ष, घाटलाडकी ५१.२५, तळेगाव मोहना १०३ लक्ष, विश्रोली १०९. ७५, कारंजा बहिरम ९५.२०, तोंडगाव १५५ लक्ष, शिरजगाव कसबा उर्दू शाळा- १४५. ०८ लक्ष, ब्राम्हणवाडा थडी उर्दू शाळा- ११७ लक्ष, शिरजगाव बंड येथील उर्दू शाळा- ८७.३० लक्ष, देऊरवाडा येथील उर्दू शाळा- ९७.५० लक्ष, राजना पूर्णा येथील उर्दू शाळा- ५९.६० लक्ष व अचलपूर तालुक्यातील हरम येथील शाळेकरिता ८५.९८ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. परिणामी या शाळांचे रूप पालटल्याचे दिसून येते.

Web Title: Achalpur became the home of education, a fund of 1200 crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.