अचलपूर मतदारसंघ 'हॉट' ठरणार; राज्याच्या राजकारण्यांचे लागले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 11:06 AM2024-10-28T11:06:27+5:302024-10-28T11:08:36+5:30

Amravati : बच्चू कडू सलग पाचव्यांदा रिंगणात, दिव्यांगांच्या हक्काच्या नेतृत्वाचे आज नामांकन

Achalpur constituency will be 'hot'; State politicians took notice | अचलपूर मतदारसंघ 'हॉट' ठरणार; राज्याच्या राजकारण्यांचे लागले लक्ष

Achalpur constituency will be 'hot'; State politicians took notice

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
सत्ता पक्षात असो वा विरोधात आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेत शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, आबालवृद्ध, महिलांच्या हक्कासाठी कधीही तडजोड केली नाही. प्रसंगी थेट मुख्यमंत्र्यांशी भिडणारे बच्चू कडू हे अलीकडे वेगळेच रसायन ठरले आहे. त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीत अचलपूर मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 

दिव्यांगाच्या हक्काचा निधी स्थानिक स्वराज्य संस्था अथवा शासनाने त्यांच्यासाठी विविध योजना राबविण्यासाठी विधिमंडळात कायदे करणारा आमदार अशी बच्चू कडू यांची राज्याच्या इतिहासात नोंद घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दिव्यांगासाठीचा निधी खर्च झाला अथवा नाही? याची शहानिशा करण्यासाठी थेट जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगरपलिकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेणारे आमदार बच्चू कडू ठरले. म्हणून राज्य सरकारने बच्चू कडू यांच्या मागणीनुसार राज्यात दिव्यांग विकास विभागाची निर्मिती केली. मात्र शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आणि महिलांच्या प्रश्नांना राज्य सरकार बगल देत असल्याने संतप्त होऊन त्यांनी महायुतीच्या नेत्यांशी पंगा घेतला. आमदार बच्चू कडू यांनी राज्यात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीचे नेतृत्व करण्याचा निर्णय घेतला, हे विशेष. 


एवढेच नव्हे तर विधानसभेच्या अनेक जागांवर प्रहारचे उमेदवारदेखील उभे केले. त्यामुळे बच्चू कडू यांच्या राजकीय वाटचालीकडे महायुती वा महाविकास आघाडीचे लक्ष लागले आहे. ते अचलपूर मतदार संघातून तब्बल सहाव्यांदा नामांकन भरत असल्याने हा मतदारसंघ राज्यात राजकीयदृष्ट्या 'हॉट' ठरणार आहे.


प्रहारकडून सोमवारी उमेदवारी दाखल करणार 
प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि परिवर्तन महाशक्तीचे अचलपूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे पाचव्यांदा हे सोमवारी, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता महानामांकन रॅलीच्या माध्यमातून सलग सहाव्यांदा नामांकन अर्ज दाखल करणार आहेत. सलग चार निवडणुकीत विजय मिळवून विक्रम प्रस्थापित करणारे हे पाचव्यांदा अचलपूर मतदारसंघात नव्या इतिहासाची नोंद करण्यासाठी बच्चू कडू यांनी सुक्ष्म रणनीती आखली आहे.


आईच्या स्मृती स्थळावर दर्शनानंतर रॅली
बच्चू कडू हे २८ ऑक्टोबर रोजी सकाळी सर्वप्रथम बेलोरा येथे गावी जाऊन आईच्या स्मृती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर अचलपूर येथील गांधी पुलावरून निघणाऱ्या महानामांकन रॅलीत सहभागी होतील, नामांकन रॅलीसाठी गावा-गावातून हजारो शेतकरी, युवक, दिव्यांग आणि मातृशक्ती सहभागी होणार असून तसे नियोजन प्रहारने केले आहे. त्यांच्या नामांकनासाठी परिवर्तन महाशक्तीचे राजू शेट्टी आणि संभाजीराजे भोसले देखील येण्याची शक्यता आहे. 

Web Title: Achalpur constituency will be 'hot'; State politicians took notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.