अचलपूर नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:56+5:302021-07-02T04:09:56+5:30

चार वाजता लागतात दुकानांना टाळे : दुकानदारांचे सहकार्य अचलपूर : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अचलपूर नगरपालिका ...

Achalpur Municipal Council in Action Mode | अचलपूर नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये

अचलपूर नगर परिषद ॲक्शन मोडमध्ये

Next

चार वाजता लागतात दुकानांना टाळे : दुकानदारांचे सहकार्य

अचलपूर : कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने अचलपूर नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहे. परिणामी शहरातील सर्व दुकानांना चार वाजता टाळे लागत आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील दुकानांकरिता सकाळी ७ ते ४ अशी वेळ ठरवली आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस व नगर परिषद प्रशासन रस्त्यावर उतरले आहे. बुधवारी दुपारी ४ वाजता शहरातील अचलपूर पोलीस स्टेशन हद्दीतील चावल मंडी, देवडी, झेंडा चौक, सराफा, बुद्धेखां चौक, बिलनपुरा, टक्कर चौक, खिडकी गेट या ठिकाणची सर्व दुकाने दुपारी ४ वाजता बंद करण्यात आली. स्त्यावर विनाकारण फिरत असलेल्या तसेच विनामास्क नागरिकांना पोलीस व नगरपालिका प्रशासन दंडित करीत आहेत. दुपारी ४ नंतर रस्ते निर्मनुष्य होत असून, प्रशासनाच्या कार्यवाहीबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Web Title: Achalpur Municipal Council in Action Mode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.