अचलपूर नगर परिषदेचा कचरा डेपो बनले ‘नंदनवन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 11:54 PM2019-07-15T23:54:41+5:302019-07-15T23:54:58+5:30

अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे.

Achalpur Municipal Council garbage depot becomes 'Nandvanvan' | अचलपूर नगर परिषदेचा कचरा डेपो बनले ‘नंदनवन’

अचलपूर नगर परिषदेचा कचरा डेपो बनले ‘नंदनवन’

googlenewsNext
ठळक मुद्देपशुपक्षांसह मानवालाही उपयुक्त : फुलपाखरांकरिता १५ हजार चौरस फूट जागा

अनिल कडू ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर नगर परिषदेच्या परतवाडा-बेलखेडा रोडवरील कचरा डेपोचे नंदनवन झाले आहे. या कचरा डेपोच्या सात एकर जागेवर पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त वनराई, फळ व फुलझाडे, औषधी वनस्पतीसह उद्यान विकसित करण्यात आला आहे.
३० ते ३५ वर्षांपासून असलेल्या या परतवाडा कम्पोस्ट डेपोत कचऱ्याचे ढीग लागले होते. सर्वत्र दुर्गंधी होती. या अशा जागेवरील कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन करीत बायो-मायनिंग अंतर्गत ही जमीन पूर्ववत योग्य स्थितीत उपयोगक्षम बनविली गेली. चौदाव्या वित्त आयोगाकडून प्राप्त अनुदानातून कचºयावर प्रक्रिया करीत अचलपूर नगरपालिका प्रशासनाने ही साइट रिकव्हर केली. केंद्र व राज्य शासन पुरस्कृत अमृत मिशन अभियानांतर्गत या ठिकाणी नगर परिषदेने हरितपट्टा विकसित केला. यात वनराईसह बगीचा निर्माण केला. यावर २०१६ ते २०१९ या तीन वर्षात साडेचार कोटी खर्च केले. पक्ष्यांंकरिता फळझाडं, फुलपाखरांकरिता फूलझाडं, मानवाकरिता वनौषधी वृक्षांसह सर्वच प्रकारची पर्यावरण पूरक वनस्पती यात लावण्यात आली आहेत. आंध्र प्रदेशातील पाम व अशोका वृक्षांसह स्थानिक वृक्षांनी या ठिकाणी आपली मुळं रोवली आहेत.
फुलपाखरांसह नागरिकांचीही सोय
अमृत मिशन अंतर्गत हरित पट्टा विकसित करताना या सात एकर जागेतील १५ हजार चौरस फूट जागा फुलपाखरांकरिता विकसित करण्यात आली आहे. नागरिकांकरिता याच ठिकाणी ३० हजार चौरस फूट जागेत लॉन विकसित करण्यात आले आहे.
राज्यात एकमेव
अमृत मिशन अंतर्गत देशपातळीवर ५००, तर राज्यात ४४ शहरे निवडली आहेत. कचरा डेपोच्या जागेवर हरित पट्टा विकसीत करणारे अचलपूर हे त्यांच्यापैकी पहिले शहर ठरले आहे. याची दखल राज्य शासनानेही घेतली आहे. केंद्र व राज्य स्तरावरील दोन खासगी स्वतंत्र यंत्रणेकडून याची त्रयस्थ तपासणीही पार पडली. अर्बन फॉरेस्ट डेव्हलप करणारी अचलपूर पहिली नगरपालिका ठरली आहे.

पशूपक्ष्यांसह मानवालाही उपयुक्त असे पर्यावरणपूरक वातावरण कचरा डेपोच्या ठिकाणी निर्माण करण्यात आले आहे.
- राज अग्रवाल
विकसक, परतवाडा

अमृत मिशन अभियानांतर्गत कचरा डेपोच्या जागेतील कचºयाची विल्हेवाट लावून वनराई, बगीचा, हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे.
- अशोक दुधानी, अभियंता अचलपूर नगरपरिषद

Web Title: Achalpur Municipal Council garbage depot becomes 'Nandvanvan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.