अचलपूर नगरपरिषद कंत्राटदारामुळे त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:11 AM2021-01-14T04:11:46+5:302021-01-14T04:11:46+5:30

विशेष रस्ते विकास निधीतील कामे रखडली परतवाडा : अचलपूर नगरपरिषद कंत्राटदारामुळे त्रस्त आहे. यात परतवाडा व अचलपूर शहरातील विशेष ...

Achalpur Municipal Council suffers due to contractor | अचलपूर नगरपरिषद कंत्राटदारामुळे त्रस्त

अचलपूर नगरपरिषद कंत्राटदारामुळे त्रस्त

googlenewsNext

विशेष रस्ते विकास निधीतील कामे रखडली

परतवाडा : अचलपूर नगरपरिषद कंत्राटदारामुळे त्रस्त आहे. यात परतवाडा व अचलपूर शहरातील विशेष रस्ते विकास निधीतील कामे दीड-दोन वर्षांपासून रखडली आहेत. यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शहरांतर्गत उखडलेल्या मुख्य रस्त्यामुळे अचलपूर नगरपालिकेचे नाक कापल्या गेले आहे.

अचलपूर नगर परिषदेला विशेष रस्ते विकास निधी अंतर्गत २०१७-१८ मध्ये कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला. हा निधी २०१९-२० पर्यंत खर्च करणे अपेक्षित होते. या निधी अंतर्गत परतवाडा शहरातील जयस्तंभ चौक ते लक्ष्मी टॉकीज, लक्ष्मी टॉकीज ते जगदंबा चौक, जगदंबा चौक ते दुराणी चौक, दुरानी चौक ते गुजरीबाजारपर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरणासह डांबरीकरणाचे काम रोड साईडच्या नालीचे बांधकाम घेतल्या गेले. १ कोटी १० लाख २८ हजार रुपये अपेक्षित खर्चाचे हे काम करण्यास कंत्राटदार नियुक्त केले गेले. या कंत्राटदाराने चार-पाच लाखांचे काम पूर्णत्वासही नेले. यानंतर त्या कामाकडे त्याने दुर्लक्ष केले. काम शेवटास नेलेच नाही. नगर परिषदेच्या सुचनांकडेही दुर्लक्ष केले आणि काम मध्येच टाकूण दिले.

याच निधी अंतर्गत अचलपूर शहर ते गोदावरी मंगलकार्यालय व्हाया देवडी ते हिरापूर गेटपर्यंतच्या रस्त्याचे काम घेण्यात आले. ८१ लाख १२ हजार ३१२ रुपये अपेक्षित खर्चाच्या या कामात, रस्त्याच्या मजबुतीकरणासह डांबरीकरण प्रस्तावीत केल्या गेले. पण हे कामही दीड वर्षांपासून रखडलेले आहे. संबंधित कंत्राटदारानेही ते काम टाकून दिले.

रखडलेले आणि कंत्राटदाराने टाकून दिलेल्या कामाच्या अनुषंगाने नगर परिषदेने या कामांच्या फेरनिविदा काढल्यात. एक नाही तर तीन वेळा निविदा प्रकाशित केल्यात. पण ते काम करायला कंत्राटदार नगरपरिषदेकडे फिरकलेच नाहीत. अखेर शहरातील एका कंत्राटदाराची मनधरणी करून नगरपरिषदेने ते काम देण्याची तयारी चालविली आहे.

बॉक्स

पालिका क्षेत्रात सार्वजनिक बांधकाम विभाग

अचलपूर नगर परिषद क्षेत्रांतर्गत जवळपास चार कोटींची रस्ते विकासाची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. यात परतवाडा आठवडी बाजार ते टीव्ही टॉवर, टिळक चौक दरम्यानचा रस्ता आहे. अचलपूर शहरातील अचलपूर नाका जीवनपूरा ते माळवेशपूरा गेटपर्यंतचा रस्ता रुंदीकरण, मजबुतीकरणासह डांबरीकरणाकरिता घेण्यात आला आहे. दुल्हागेट श्रीकृष्णपूल गांधीपूल, चावलमंडी या रस्त्याचे काम समाविष्ट आहे. ही कामे अचलपूर सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत केली जाणार आहे. यात शहरातील काही अंतर्गत रस्त्यांचाही समावेश आहे.

Web Title: Achalpur Municipal Council suffers due to contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.