अचलपूर पालिका कर्मचारी संघटनेचे लेखणी बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:13 AM2021-04-16T04:13:05+5:302021-04-16T04:13:05+5:30
परतवाडा : अचलपूर नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. ...
परतवाडा : अचलपूर नगर परिषद कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने गुरुवारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले. कोरोनाकाळात कडक निर्बंध व नियमांचे नागरिकांकडून काटेकोर पालन करून घेण्याची जबाबदारी ज्या पालिका कर्मचाऱ्यांवर आहे, त्यांनाच त्यांच्या मागण्यासाठी आंदोलन करावे लागते, हा शहरात चर्चेचा विषय ठरला.
राज्यातील पालिका कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाला अनेकदा निवेदने, पत्रे, विविध प्रकारचे आंदोलन करण्यात आले. तरीसुद्धा मंजूर केलेल्या मागण्या त्याची पूर्तता केली गेली नाही. आता तीन टप्प्यांत आंदोलन केले जात आहे.
१ एप्रिल रोजी काळ्या फिती लावून प्रलंबित मागण्यांसाठी निषेध केल्यानंतर १५ एप्रिल रोजी एक दिवस लेखणी बंद ठेवून आंदोलनाचा दुसरा टप्प्यातील आंदोलन करण्यात आले. अचलपूर येथील या आंदोलनाला जिल्हा अध्यक्ष अनिल तायडे, रोहन राठोड, तुषार तायडे, नंदू कडू, विजय झाडे, कुणाल चौटीयाल, सुनील पावित्रकर, सलमान अली, रफिक, संजय बोबडे, पालिकेतील इतर कर्मचारी सहभागी झाले होते