अचलपूर नगरपालिका कर्मचारी वेतनाविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:13 AM2021-04-01T04:13:21+5:302021-04-01T04:13:21+5:30

फोटो - कडू ३१ एस आज काळी फीत लावून कामकाज, १५ एप्रिलला लेखणी बंद, १ मे पासून बेमुदत काम ...

Achalpur municipal employees without pay | अचलपूर नगरपालिका कर्मचारी वेतनाविना

अचलपूर नगरपालिका कर्मचारी वेतनाविना

Next

फोटो - कडू ३१ एस

आज काळी फीत लावून कामकाज, १५ एप्रिलला लेखणी बंद, १ मे पासून बेमुदत काम बंद

परतवाडा : महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी राज्यभर १ एप्रिलला काळ्या फिती लावून काम करणार आहेत. त्यामध्ये अचलपूर नगरपालिकेचे कर्मचारी सहभागी होत आहेत. दोन महिन्यांपासून विनावेतन काम करताना या कर्मचाऱ्यांची तगमग होत आहे.

संघटनेने आपल्या न्याय्य मागण्यांकरिता तीन टप्प्यात आंदोलन छेडण्याचे नियोजन केले. यात १५ एप्रिलला हे कर्मचारी लेखणी बंद आंदोलन करणार आहेत. १ मे पासून बेमुदत काम बंद आंदोलनाची घोषणा संघटनेकडून करण्यात आली आहे. सहायक अनुदानाऐवजी शंभर टक्के वेतन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे कोषागारामार्फत करण्यात यावे. सातव्या वेतन आयोगाचे थकीत हप्ते रोखीने द्यावेत यांसह अन्य मागण्या संघटनेकडून पुढे करण्यात आल्या आहेत. नगर परिषद कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष विश्वनाथ घुगे, उपाध्यक्ष दीपक रोडे, सचिव रामेश्वर वाघमारे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असल्याचे सहसचिव गणेश खडके व अमरावती जिल्हाध्यक्ष अनिल तायडे यांनी दिली.

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या अनुषंगाने अचलपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना संघटनेच्यावतीने ३१ मार्चला निवेदन देण्यात आले. याप्रसंगी संघटनेचे प्रतिनिधी व कर्मचारी उपस्थित होते. आंदोलनात जिल्ह्यातील सर्व नगपरिषद कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन अचलपूरचे विजय देशमुख, संजय बोबडे, श्रीपाद कोलवाडकर, निशांत मिश्रा, विजय झाडे, रमेश वाटाणे, प्रभू जनवारे, केशरी राणे, अंजनगाव सुर्जीचे गजानन इंगळे, दर्यापूरचे श्यामकांत विल्हेकर, चांदूर बाजारचे राजेंद्र जाधव, चांदूर रेल्वेचे राहुल इमले, मोर्शीचे गोपाल वाघमारे, शेंदूरजनाघाटचे अमोल ढोले, वरूडचे प्रकाश फुसे, धामणगाव रेल्वेचे राजेंद्र भोंगे, चिखलदऱ्याचे गिरीश देशमुख, धारणीचे अ. अमीन अ. रशीद यांनी केले आहे.

बॉक्स

अडचणींना नाही पारावार

अचलपूर नगर परिषद कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचे वेतन अजूनही मिळालेले नाही. वेतनाअभावी नगर परिषद कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. भविष्य निर्वाह निधीसह कर्जाचे हप्तेही कर्मचाऱ्यांचे थकले आहेत.

बॉक्स

दोन कोटींचा फरक

नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनाकरिता येणाऱ्या सहायक वेतन अनुदानात दोन कोटींहून अधिक रक्कमेचा फरक पडला आहे. जवळपास दोन कोटींचा एक हप्ताच अचलपूर नगर परिषदेपर्यंत पोहोचलेला नाही. या गहाळ हप्त्यासोबतच चालू महिन्याच्या अनुदानातही कपात करण्यात आली आहे. वेतनाकरिता आवश्यक सहायक अनुदान वेळेवर न मिळणे, मिळालेच तर कमी मिळणे यामुळे नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोट

नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे थकीत कोट्यवधीचे हप्ते नगर परिषदेने भरलेले नाहीत.

- अनिल तायडे, जिल्हाध्यक्ष, न.प. कर्मचारी संघटना

Web Title: Achalpur municipal employees without pay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.