अचलपूर नगरपालिका पथदिवे दिवाबत्ती विभागाचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:16 AM2021-09-15T04:16:34+5:302021-09-15T04:16:34+5:30

पान २ बॉटम (फोटोपी-१४ अचलपूर फोल्डर) संतोष ठाकूर-अचलपूर : नगर पालिकेच्या पथदिवे विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक भागात अंधाराचे साम्राज्य ...

Achalpur Municipal Street Lighting Department | अचलपूर नगरपालिका पथदिवे दिवाबत्ती विभागाचा भोंगळ कारभार

अचलपूर नगरपालिका पथदिवे दिवाबत्ती विभागाचा भोंगळ कारभार

Next

पान २ बॉटम (फोटोपी-१४ अचलपूर फोल्डर)

संतोष ठाकूर-अचलपूर : नगर पालिकेच्या पथदिवे विभागाच्या भोंगळ कारभाराने अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. केंद्र शासनाच्या कोट्यवधींचा खर्च करून एलईडी बल्ब बसविले. मात्र, ते पांढरा हत्ती ठरले आहे. अचलपूर पालिका हद्दीतील सर्व विद्युत पोलवर ६५०० बल्ब लावले आहेत. त्याचे मेंटेनन्सची जबाबदारी एस.एल कंपनीला पाच कोटी रुपयात देण्यात आली.

दर महिन्याला विद्युत बिलातून ही रक्कम देण्यात येते. नगरपरिषद प्रशासन व एस ल कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार एलईडी लाइट्स ४८ तासांपर्यंत बंद राहिल्यास त्या कंत्राटदारास ५० ते ५०० रुपये दंड करण्याचा नियम आहे. प्रत्येक इलेक्ट्रिक फोनवर टायमर सिस्टिम लावून कोणत्या एरियातील लाईट बंद आहे, हे कळते व वेळेचे व विजेची बचत होते. टायमर सुरू बंद होते. परंतु ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे ही सिस्टीम अचलपूर येथील कल्याण मंडपमध्ये धूळखात पडली आहे. दोन वर्षांपासून कुठेही विद्युत खांबावर टायमर सिस्टीम लावलेली नाही.

कंत्राटदार व नगरपरिषद यांच्यातील करारानुसार करून एकूण बारा कर्मचारी मेन्टेनन्स दुरुस्ती निघा साठी ठेवण्याचा करार आहे. मात्र सध्या केवळ दोन ते तीन कर्मचारी ठेकेदाराने नेमण्यात आले असून त्यांच्याजवळ कोणतेही वाहन नाही. ते साककिलने १३ किमीच्या हद्दीतील विद्युत पोलाचे एलईडीचे व्यवस्थापन करतात. संबंधित कंत्राटदाराने ४० वाॅर्डात दोनच कर्मचारी कार्यरत असून दोन खासगी कर्मचाऱ्यांना ही कामे करावी लागते. त्यामुळे महिलेच्या चोरीचे अपघाताची शक्यता आहे. संबंधित कंत्राट व नगर परिषद प्रशासन यांच्या संगममताने येथील जनतेला त्याचा भुर्दंड भरावा लागत आहे. नगर परिषदेच्या १० नगरसेवकांनी याबाबत रीतसर तक्रार मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. मात्र, आजपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नाही. नगर परिषदेच्या दिवाबत्ती विभागाला तक्रार देऊनही प्रशासन संबंधित ठेकेदारावर कारवाई करीत नाही.

कोट

नगर परिषद प्रशासनाला याबाबत तक्रार देऊनसुद्धा संबंधित ठेकेदारावर कारवाई केलेली नाही. करारनाम्यानुसार ठेकेदाराने नियमित सेवा द्यावी जेणेकरून २४ तासांच्या आत व नसलेले एलईडी दुरुस्त होईल, या दृष्टीने प्रयत्न व्हावे.

- बंटी ककरानिया,

सभापती, दिवाबत्ती विभाग व आरोग्य, नगर परिषद

140921\img-20210611-wa0071.jpg

अचलपुरात दिवाबत्ती विभागाचा भोंगळ कारभार

Web Title: Achalpur Municipal Street Lighting Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.