अचलपूर पंचायत समितीमध्ये भरला बाजारहाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:09 AM2021-07-18T04:09:48+5:302021-07-18T04:09:48+5:30

फोटो - १६ एएमपीएच ०५ फोटो कॅप्शन - बाजारहाटची पाहणी करताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जयंत बाबरे व अधिकारी ...

Achalpur Panchayat Samiti is full of bazaars | अचलपूर पंचायत समितीमध्ये भरला बाजारहाट

अचलपूर पंचायत समितीमध्ये भरला बाजारहाट

Next

फोटो - १६ एएमपीएच ०५

फोटो कॅप्शन - बाजारहाटची पाहणी करताना मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल जयंत बाबरे व अधिकारी

परतवाडा : ग्रामीण भागातील महिला स्वयंसहायता बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याच्या विक्रीसाठी दालान उपलब्ध करून देण्यात आले आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. महिलांच्या अडचणी शासनाच्यावतीने दूर करणार असल्याचे मत मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांनी व्यक्त केले. ते अचलपूर पंचायत समितीमध्ये शासनाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत बाजारहाटच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते

गटविकास अधिकारी जयंत बाबरे, गटविकास अधिकारी महादेव कासदेकर, स्वीय सहायक छोटू तेलगोटे, पंचायत समिती सदस्य सुनील तायडे, जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गीलवर, तालुका अभियान व्यवस्थापक कृष्णा ठाकरे, उमेद चमू विकास खंडेजोड, प्रकाश गिऱ्हे, अभिषेक वानखडे, अंकुश भिरकड, अर्पित चव्हाण आदी उपस्थित होते. अचलपूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत महिला स्वयंसाहाय्यता समूह (कोल्हा), वैष्णोदेवी समूह (सावळापूर), जागृती समूह (कांडली), हिरकणी समूह (कांडली), श्रमसफल्या समूह (कांडली), राधाकृष्ण समूह (कांडली), आधार समूह (देवमाळी), जय भोले (देवामाळी) आदी महिला समूहाने त्यांची उत्पादने विक्रीकरिता बाजारहाटमध्ये आणली होती.

बॉक्स

११५०० रुपयांची विक्री

ग्रामीण भागातील बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला भाजीपाला, मूग, ज्वारी, विविध चटण्या, पापड, कुरड्या, लोणचे, शेवळ्या, शोभेच्या वस्तू, रानभाज्या आदी विविध साहित्य बाजारहाटमध्ये विक्रीसाठी आणले होते. जवळपास ११५०० रुपयांची विक्री बाजारातून झाली. तालुक्यात एकूण १७५० स्वयंसाहाय्यता बचत गट असून, त्यापैकी जवळपास ८० बचत गट विविध उत्पादने तयार करीत आहेत.

बॉक्स

प्रत्येक गुरुवारी भरणार बाजारहाट

परतवाडा शहरात गुरुवारचा आठवडी बाजार असतो. त्याचप्रमाणे आता पंचायत समिती आवारात महिला बचत गटाद्वारे तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी प्रत्येक गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेपर्यंत विविध उत्पादनांची विक्री केली जाणार आहे. पंचायत समिती येथे १५ ऑगस्ट रोजी तालुका विक्री स्टॉल उघडण्यात आले असून, बाजारहाटमध्ये प्रत्येक गटाला संधी देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे तालुका समन्वयक कृष्णा ठाकरे यांनी लोकमतला सांगितले.

Web Title: Achalpur Panchayat Samiti is full of bazaars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.