अचलपूर पंचायत समिती सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 09:27 PM2018-10-27T21:27:07+5:302018-10-27T21:27:29+5:30
पंचायतराज संस्थेचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट कार्य करणारी अचलपूर पंचायत समिती यशवंत पंचायतराज अभियानात विभागात अव्वल ठरल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथे रवींद्र नाट्यामंदिरात राज्यपालांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : पंचायतराज संस्थेचे व्यवस्थापन व विकासकार्यात उत्कृष्ट कार्य करणारी अचलपूर पंचायत समिती यशवंत पंचायतराज अभियानात विभागात अव्वल ठरल्याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुंबई येथे रवींद्र नाट्यामंदिरात राज्यपालांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना पुरस्कृत करण्यात आले.
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभापती देवेंद्र पेटकर, उपसभापती सोनाली तट्टे, गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी पुरस्कार स्वीकारला. अचलपूर तालुक्यात शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. पंतप्रधान आवास योजना, स्वच्छता अभियान यांसारख्या योजनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावली. सोबत नवनवीन उपक्रम राबविले यासर्व नावीन्यपूर्ण उपक्रमाची फलश्रुती म्हणून पंचायत समितीने यशवंत पंचायतराज अभियानात अमरावती विभागातून प्रथम क्रमांक मिळविला. याबद्दल राज्यपालांच्या हस्ते पंचायत समितीचा सत्कार करण्यात आला.
पुरस्कार वितरण सोहळ्याला पंचायत सदस्य सुनिल तायडे, श्रीधर काळे, कविता बोरेकारसह माजी सरपंच आश्विनी पेटकर, अमोल बोरेकार, राहुल तट्टे, आकाश वाठ उपस्थित होते.