अचलपुरात सर्वांसाठी घरे योजना गतिमान करा
By admin | Published: April 8, 2016 12:13 AM2016-04-08T00:13:07+5:302016-04-08T00:13:07+5:30
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना अमरावती महापालिकेनंतर अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.
मागणी : नगरसेवक जिल्हाधिकाऱ्यांना भेटले
अमरावती : केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी पंतप्रधान आवास योजना अमरावती महापालिकेनंतर अचलपूर नगरपरिषद क्षेत्रात राबविण्यात येणार आहे. मात्र मागील पाच महिन्यांपासून ही योजना राबविण्यात आली नाही. यासाठी गुरूवारी भाजप-शिवसेनेच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांची भेट घेतली.
नगरपरिषद क्षेत्रात तातडीने ही योजना महापालिकेच्या धर्तीवर कार्यान्वित करावी, यासाठी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नियुक्ती करावी, अशी मागणी केली. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी याठिकाणी स्वतंत्र कक्ष व आॅनलाईन अर्जप्रणाली १२ एप्रिलपासून सुरू केली जाईल. यावेळी भाजपाचे गजानन कोल्हे, रूपेश ढेपे, शिवसेनेचे आशिष सहारे, ओमप्रकाश दीक्षित, किशोर कासार, भाजपा शहरध्यक्ष नीलेश सातपुते, नगरसेवक अभय माथने, नितीन डकरे, कीर्ती तायडे, सारिका नशिबकर, शिला महल्ले, नरेंद्र फिसके, प्रफुल्ल बर्वे आदी उपस्थित होते.