हेल्यांच्या टकरीत अचलपूर पोलीस बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:15 AM2021-04-28T04:15:25+5:302021-04-28T04:15:25+5:30

परतवाडा : दोन हेल्यांच्या टकरीनंतर विदर्भ मिल चौकात भर दिवसा उसळलेली गुंडागर्दी आणि केल्या गेलेल्या हाणामारीत अचलपूर पोलिसांना नाहकच ...

Achalpur police bored in the collision of Hela | हेल्यांच्या टकरीत अचलपूर पोलीस बेजार

हेल्यांच्या टकरीत अचलपूर पोलीस बेजार

Next

परतवाडा : दोन हेल्यांच्या टकरीनंतर विदर्भ मिल चौकात भर दिवसा उसळलेली गुंडागर्दी आणि केल्या गेलेल्या हाणामारीत अचलपूर पोलिसांना नाहकच बेजार व्हावे लागले.

२६ एप्रिल रोजी विदर्भ मिल चौकात सकाळी अकरा वाजेच्या सुमारास ही गुंडागर्दी नागरिकांना बघायला मिळाली.

दोन हेल्यांच्या टकरीत हारलेला हेला पळून जातानाचा फोटो आणि मेसेज त्रयस्थपण प्रत्यक्षदर्शी इसमाकडून व्हाॅट्सॲपवर व्हायरल केल्या गेला. याने संबंधितांची मने दुखावली. ज्याने मेसेज व्हायरल केला. त्याच्या शोधात त्यातील काही मंडळी हातात लाठी- काठी व शस्त्र आणि दगड, विटा घेऊन निघाली.

या सात ते आठ लोकांनी त्याला विदर्भ मिल चौकात गाठून जबर मारहाण सुरू केली. जिवाच्या भीतीपोटी तो लगतच्या एका दूध डेअरीमध्ये घुसला. तेथे त्याने स्वतःला वाचविण्याचा प्रयत्न केला; पण विटा आणि दगडांचा मारा त्याच्या दिशेने सुरूच होता. यात त्या डेअरीमध्ये उपस्थित असलेल्या दोघांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान काहींनी अचलपूर पोलिसांना याची माहिती दिली. लागलीच अचलपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस येत असल्याची भणक लागताच ते घटनास्थळावरून निघून गेले.

जवळपास वीस ते पंचवीस मिनिटे चाललेली ही गुंडागर्दी, अरेरावी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. घटनास्थळी दाखल अचलपूर पोलिसांनी त्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणीसुद्धा केली व लागलीच पोलीस गुंडागर्दी करणाऱ्यांच्या घराकडे वळले; पण त्या घराला कुलूप आढळून आले. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच मारणाऱ्या व मार खाणाऱ्या दोन्ही पक्षांकडून लागलीच आपसी समझोता केल्या गेला. जणू काही, काही घडलेच नाही या बेतात मध्यस्थांनी यशस्वी मध्यस्थी करून हे मनोमिलन घडवून आणले.

इकडे मात्र भरदिवसा भरचौकात लोकांच्या डोळ्यादेखत घडलेल्या या गुंडागर्दीची आणि हेल्यांच्या टकरीची चर्चा शहरात सर्वत्र पसरली. यात दोन्ही पक्षांच्या मनोमिलनानंतर आपसी समझोता घडवून पोलिसांकडे कुठलीही तक्रार दाखल न करणाऱ्यांची दखल मात्र अचलपूर पोलिसांनी घेतली. अचलपूर पोलिसांनी गुंडागर्दी करणाऱ्यांविरुद्ध आपल्या दप्तरी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.

Web Title: Achalpur police bored in the collision of Hela

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.