काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 11:11 PM2017-11-23T23:11:20+5:302017-11-23T23:12:27+5:30

परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे.

Action against blackmoney | काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

काळवीटप्रकरणी दोषींवर होणार कारवाई

Next
ठळक मुद्देसीसीएफचे फर्मान : उपवनसंरक्षकांवर सोपविली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. याप्रकरणी उपवनसंरक्षकांनी चौकशी समिती नेमल्याची माहिती आहे.
रविवार, १९ नोव्हेबर रोजी पोस्टमार्टम न करता जमिनीत पुरविल्या गेलेल्या काळवीटचे मंगळवारी उशिरा पोस्टमार्टम करण्यात आले. पशु वैद्यकीय अधिकाºयांनी अवयव (विसेरा) प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. मात्र, भारतीय वन्यजीव कायदा १९८० नुसार वन्यप्राणी वर्गवारी १ मध्ये गणल्या जाणाºया काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर नियमानुसार पोस्टमार्टम आणि दफनविधी करणे अपेक्षित होते. परंतु, नियम गुंडाळून आरएफओ ते वनपाल यांनी विषबाधेने काळवीट मृत्यूप्रकरण फारशे गांभीर्याने घेतले नाही. याबाबतचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रकाशित झाले. त्यानंतर वनविभाग खळबळून जागा झाला. त्यानंतर परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. बारखडे यांच्या सूचनेनुसार मंगळवारी २१ नोव्हेबर रोजी पुन्हा घटनास्थळी जाऊन जमिनीत पुरविलेले मृत काळवीट बाहेर काढले. अंजनगाव सुर्जी तालुक्यातील भंडारज येथील शासकीय पशुवैद्यकीय अधिकारी मेहरे यांनी मृत काळवीटचे शवविच्छेदन केले.
दरम्यान, शरीरातील अवयव बाहेर काढून ते प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त होताच काळवीटाचे मृत्यू कशामुळे झाला हे अहवालाअंती स्पष्ट होईल, असे लेखी पत्र आरएफओ बारखडे यांनी दिले आहे. मात्र, मृत काळवीटचे प्रकरण वरिष्ठांना न कळविता ते परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी सीसीएफ प्रवीण चव्हाण हे फारच संतापले आहे. मृत काळवीटप्रकरणी जे कोणी दोषी असेल, त्यांच्यावर कठोर कारवाई करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश उपवनसंरक्षक हेमंत मिणा यांना दिले आहेत. त्यामुळे याप्रकरणी कोणावर कारवाई होते, याकडे वनविभागात नजरा लागल्या आहेत.

वर्गवारी १ च्या वन्यप्राण्यांबाबत अनास्था का?
काळवीट हा वन्यप्राणी वाघ, बिबट्याच्या वर्गवारीत गणला जातो. त्यामुळे अचानक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतरही ते कशामुळे दगावले, याची शहानिशा न करता परस्पर पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. याप्रकरणी संबंधित वनाधिकाºयांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी वार संघटनेचे नीलेश कंचनपुरे यांनी उपवनसंरक्षक हेमंत मीणा यांच्याकडे केली आहे.
‘वार’ संघटनेची सीसीएफकडे तक्रार
काळविटाचे मृत्यू झाल्यानंतर हे प्रकरण बाहेर येऊ नये, यासाठी परस्पर दफनविधी करून पुरावे नष्ट करणारे अधिकारी, कर्मचाºयावर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्यान्यवे कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वार संघटनेचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षकांकडे केली आहे.

मृत काळवीट प्रकरण हे अतिशय गंभीर आहे. यात दोषींवर कठोर कारवाई आदेश डीएफओ मीणा यांना दिले आहेत. याबाबत लवकरच अहवाल प्राप्त होईल.
- प्रवीण चव्हाण
मुख्य वनसंरक्षक, अमरावती

सीसीएफ यांनी मृत काळवीट प्रकरणी दोषींवर कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले आहे. चौकशीची जबाबदारी सहायक वनसंरक्षकांवर सोपविली आहे. याप्रकरणी दोषींवर कारवाई होईल.
- हेमंत मिणा
उपवनसंरक्षक, अमरावती.
 

Web Title: Action against blackmoney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.