पाडा येथे जुगाऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:13 AM2021-02-12T04:13:32+5:302021-02-12T04:13:32+5:30

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील पाडा येथे धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी ...

Action against gamblers at Pada | पाडा येथे जुगाऱ्यांवर कारवाई

पाडा येथे जुगाऱ्यांवर कारवाई

Next

अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील पाडा येथे धाड टाकून जुगाराच्या साहित्यासह ४६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

आरोपी चंद्रकांत बाबाराव नागदिवे (४३, रा. अशोकनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

------------------------------------------------

देवीनगरात अवैध दारू पकडली

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील देवीनगरस्थित बांबू गार्डनजवळील पुलाखाली धाड टाकून अवैध दारू व एक दुचाकी असा एकूण ६९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

--------------------------------------------

चांदणी चौकमध्ये दारू जप्त

अमरावती : बडनेरा पोलिसांनी बडनेरा जुनी वस्तीतील चांदणी चौक येथे कारवाई करून अवैध दारू व एक दुचाकी असा एकूण ३७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई बुधवारी करण्यात आली.

या प्रकरणी आरोपी सचिन शंकरराव बेले (२८, रा. गांधीनगर जुनी वस्ती), अक्षय सतीश चव्हाण (२७, रा. कालीमाता नगर बडनेरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

-------------------------------------------

गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

अमरावती : एका इसमाने राहत्या घरी उत्तमनगर येथे गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी घडली.

हिंमत महादेवराव हटकर (५८, रा. उत्तमनगर) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृताचे पत्नी व मुले वेगळे राहत होते. हिंमत हटकर हे तीन ते चार वर्षांपासून वयोवृद्ध आईसह वेळगे राहत असल्याची पोलिसांकडे नोंद आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: Action against gamblers at Pada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.