कारवाईचा इशारा, कृती केव्हा ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:18 PM2017-09-18T22:18:58+5:302017-09-18T22:19:09+5:30
यंदाच्या हंगामातील मूग व उडीद बाजार समित्यांमध्ये विक्रीला येताच व्यापाºयांनी भाव पाडले. हमीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास .....
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या हंगामातील मूग व उडीद बाजार समित्यांमध्ये विक्रीला येताच व्यापाºयांनी भाव पाडले. हमीपेक्षा कमी दराने खरेदी केल्यास त्या व्यापाºयावर फौजदारी दाखल करू, असा इशारा गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी रविवारी अकोला येथे दिला. यापूर्वी अमरावती येथे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी यापूर्वी कित्येकदा व्यापाºयांवर कारवाईचे इशारे दिले. मात्र, आतापर्यंत एकाही व्यापाºयावर कारवाई झाली नसल्याने शेतकºयांची खुलेआम लूट होत आहे.
यंदाच्या हंगामात मूग व उडीद आता बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत असताना आधारभूत किमतीपेक्षा १ हजार रूपये प्रती क्विंटलपेक्षा कमी दराने व्यापाºयांद्वारा खरेदी केली जात आहे. वास्तविक मागीलवर्षी याचवेळी मूग व उडिदाला सहा हजारावर भाव होता.
यंदा मात्र मूग व उडदाला अवघ्या चार हजरांच्या आसपासच भाव मिळत आहे. यावर्षी मुगाला पाच हजार ३७५ रूपये प्रती क्विंटल हमीभाव व २०० रूपये क्विंटल बोनस जाहीर केला आहे. प्रत्यक्षात बाजारात मात्र ३५०० ते ४१०० दरम्यान दर मागिल महिनाभरापासून मिळत आहे.
यंदाच्या हंगामात पेरणीपासूनच पाऊस गायब असल्यामुळे ६० दिवसांच्या अल्प कालावधीत येणारे मूग व उडिदाचे पीक आधीच बाद झाले आहे. यामधून वाचलेल्या पिकांचा हंगाम आता सुरू झाला आहे. नवीन मूग व उडीद बाजारात येताच हमीपेक्षा कमी दराने व्यापाºयांद्वारा खरेदी करण्यात येत असल्याने उत्पादन खर्च निघणे देखील कठीण झाले आहे. अशा स्थितीत शासनाचे खरेदी केंद्र सुरू झाले असते तर खुल्या बाजारातील भावात घसरण देखील झाली नसती व शेतकºयांना हमीभावाचे संरक्षण कवच मिळाले असते. मात्र, तसे न होता शासन-प्रशासनाद्वारा केवळ व्यापाºयांवर कारवाईचे इशारे देण्यातच धन्यता मानली जात असल्याने व्यापाºयांचे फावत आहे.
निर्यातीला परवानगी, भाववाढीची शक्यता
केंद्र शासनाने तूर, मूग व उडदाच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. यासंधीचा फायदा घेऊन निर्यात सुरू झाल्यास या कडधान्याची भाववाढ होऊन शेतकºयांना दिलासा मिळू शकतो. पुणे येथे झालेल्या खरीप हंगाम आढावा सभेत राज्याचे कृषी व पणन् विभागाचे सचिव विजयकुमार यांनी याविषयी माहिती दिल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
दसºयानंतर सुरू होणार शासकीय केंद्र
राज्यात नव्याने मूग व उडदाची आवक खुल्या बाजारात होत असताना दर हमीपेक्षा १ हजार रूपयांनी कोसळले आहेत. यासाठी केंद्र शासनाकडे खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव कृषी व पणन विभागाने पाठविला आहे. अद्याप त्याला मंजुरी मिळाली नसली तरी लवकरच मिळणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. त्यानुसार राज्यात दसºयानंतर शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शक्यता आहे.