रस्त्यावर गुरे बांधणाऱ्या पशुपालकावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:14 AM2021-07-31T04:14:02+5:302021-07-31T04:14:02+5:30
अमरावती : येथील प्रभू कॉलनीत रस्त्यावर अतिक्रमण करून गुरे बांधणे व विनापरवानगी दुग्धव्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर पशुसंवर्धन व अतिक्रमण विभागाने ...
अमरावती : येथील प्रभू कॉलनीत रस्त्यावर अतिक्रमण करून गुरे बांधणे व विनापरवानगी दुग्धव्यवसाय करणाऱ्या ठिकाणावर पशुसंवर्धन व अतिक्रमण विभागाने शुक्रवारी कारवाई केली. यावेळी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना अटकाव करून शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविल्याची माहिती महापालिकेचे पशुचिकित्सा अधिकारी सचिन बोंद्रे यांनी दिली.
त्याअनुषंगाने पशुवैद्यक विभागान ही कारवाई केली. दरम्यान पशुपालकांकडील महिलांनी कारवाईत अडथळा आणल्याने पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली.
नागरी क्षेत्रात गुरे पाळणे अधिनियम, तथा सर्वसाधारण सभा यांनी शहरांमध्ये जनावरे पाळणे संबंधित ठरविण्यात आलेल्या नियमाला अनुसरून सर्व पशुपालकांनी आपली जनावरे आजूबाजूच्या परिसरातजाऊ देऊ नये, याशिवाय महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातही सांडपाण्याची व्यवस्था न करणे, विनापरवानगी जनावरे पाळणे ह्या सर्व नियमांना डावलून जनावरांचे पालन पोषण होत असल्यास पशुपालकांवर दंडात्मक कारवाई व कलम ३५३ नुसार प्रशासकीय कामांमध्ये अडथळा आणल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती बोंद्रे यांनी दिली.